नवी दिल्ली : वृत्तसंस्था – जर आपण कमी गुंतवणूकीत एखादा व्यवसाय करण्याचा विचार करत असाल तर आम्ही तुम्हाला एका विशिष्ट व्यवसायाबद्दल सांगत आहोत. २ लाख रुपये लावून आपण हा व्यवसाय सुरू करू शकता. पापड बनवण्याचा व्यवसाय फक्त २ लाख रुपयांमध्ये करता येतो. नॅशनल स्मॉल इंडस्ट्रीज कॉर्पोरेशनने (एनएसआयसी) यासाठी एक प्रकल्प अहवाल तयार केला असून या माध्यमातून तुम्हाला मुद्रा योजनेअंतर्गत ४ लाख रुपयांचे कर्ज स्वस्त दराने मिळणार आहे. या अहवालानुसार एकूण ६ लाख रुपयांच्या गुंतवणूकीसह सुमारे ३० हजार किलो उत्पादन क्षमता तयार केली जाईल. हा व्यवसाय सुरू करण्यासाठी आपल्यास ६.०५ लाखांचा खर्च येईल. एकूण खर्चामध्ये निश्चित भांडवल आणि कार्यरत भांडवलाचा समावेश आहे.
निश्चित भांडवलामध्ये दोन मशीन, पॅकेजिंग मशीन उपकरणे यासारख्या सर्व खर्चाचा समावेश असतो. कार्यरत भांडवलामध्ये कर्मचाऱ्यांचा तीन महिन्यांचा पगार, तीन महिन्यांचा कच्चा माल आणि उपयुक्तता उत्पादनांचा खर्च समाविष्ट असतो. याशिवाय भाडे, वीज, पाणी, दूरध्वनी बिले आदी खर्चाचाही समावेश आहे.
या मशीनची आवश्यकता
पापड बनवण्यासाठी तुम्हाला स्विफ्टर, दोन मिक्सर, प्लेटफॉर्म बैलेंस, इलेक्ट्रिकली ऑपरेटेड ओवन, मार्बल टेबल टॉप, पोळपाट लाटणे , एल्युमीनियमची भांडी आणि रॅक्स सारख्या अनेक गोष्टींची आवश्यकता आहे.
२५० स्वेअर फूट जागेची गरज
पापड बनवण्याच्या व्यवसायासाठी कमीत कमी २५० स्वेअर फूट जागेचे गरज लागते. जर स्वतःची जागा नसेल तर तुम्ही एवढी जागा भाड्याने घेऊ शकता. तीन साधे कामगार, दोन प्रशिक्षित कामगार आणि एका सुपरवायझरची गरज आहे. या सर्वांच्या पगारावर २५ हजार खर्च येईल जो की हिशोबात धरलेला आहे.
स्वतःचे गुंतवावे लागतील दोन लाख रुपये
सहा लाखांच्या ऐकून भांडवलापैकी दोन लाख रुपये तुम्हाला स्वतः कडचे लावावे लागतील आणि सरकारच्या मुद्रा योजनेनुसार चार लाखांचे कर्ज तुम्हाला मिळेल. ज्यासाठी तुम्ही जवळच्या कोणत्याही बँकेत अर्ज करू शकता. घेतलेले कर्ज तुम्ही पाच वर्षांपर्यंत भरू शकता.
योग्य पद्धतीने मार्केटिंग करा
उत्पादन बनल्यानंतर तुम्हाला त्याला विकावं लागेल यासाठी छोट्या पासून ते मोठ्या रिटेलरला तुम्ही धरून तुमचे उत्पादन विकू शकता.
Visit : bahujannama.com