पुणे : बहुजननामा ऑनलाईन – Burning Bus In Pune | पुण्यात बावधन (Bavdhan) येथे पीएमपीएमएल बसने (PMPML Bus) भररस्त्यात अचानक पेट घेतला. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या (Pune Fire Brigade) कोथरुड (Kothrud) आणि पाषाण (Pashan) येथील दोन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. अग्निशमन दलाच्या जवानांनी पाणी मारुन आग विझवली आहे. दरम्यान, आग विझवताना भडका उडाल्याने अग्निशमन दलाचे अधिकारी गजानन पाथरुडकर (Gajanan Pathrudkar) हे जखमी झाले आहेत. (Burning Bus In Pune)
पुण्यातील कोथरुड येथील चांदणी चौकात (Chandni Chowk Kothrud) बसने अचानक पेट घेतला. ही घटना आज (रविवार ) दुपारी 2.09 सुमारास घडली. बसने अचानक पेट घेतल्याने बसमधील प्रवाशांना तातडीने खाली उतरवण्यात आले. या घटनेमुळे या मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली आहे. घटनेची माहिती मिळताच कोथरुड आणि पाषाण अग्निशमन दलाच्या दोन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. आग विझवत असताना अचानक भडका उडाल्याने अग्निशमन दलाचे अधिकारी गजानन पाथरुडकर हे जखमी झाले. त्यांना तातडीने चेलाराम हॉस्पिटलमध्ये (Chelaram Hospital) उपचारासाठी दाखल करण्यात आले. याठिकाणी प्राथमिक उपचार केल्यानंतर त्यांना सुर्या हॉस्पिटलमध्ये (Surya Hospital) दाखल करण्यात आल्याची माहिती अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी दिली. (Burning Bus In Pune)
बसने पेट घेतल्याच्या वेळी बसमध्ये किती प्रवासी प्रवास करत होते.
आणि ही आग कशामुळे लागली याची माहिती अद्याप समजू शकली नाही.
अग्निशमन दलाच्या दोन गाड्यांनी तात्काळ घटनास्थळी जाऊन बसला लागलेली आग विझवली आहे. सध्या या ठिकाणी कुलींगचे काम सुरु असल्याचे सांगण्यात येत आहे.
Web Title :- Burning Bus In Pune | A PMPML bus catches fire in Chandni Chowk Kothrud on Sunday Afternoon
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
- Nitesh Narayan Rane | नारायण राणे आणि नितेश राणेंविरोधात गुन्हा दाखल ! दिशा सालियानबाबतच्या वादग्रस्त विधानामुळं FIR
- Mahashivratri 2022 | महाशिवरात्री निमित्त श्री क्षेत्र भिमाशंकर येथे वाहनतळ सुविधा; भाविकांची गैरसोय टाळण्यासाठी प्रशासनाचे नियोजन
- Power Failure Mumbai Local Trains | मुंबईतील अनेक भागातील वीज ‘गुल’;उपनगरीय रेल्वे सेवेवर परिणाम
- Avoid These 6 Foods in Lunch | सावधान ! लंचमध्ये चुकूनही घेऊ नका ‘या’ 6 गोष्टी, सेवन केल्याने येतो आळस; आजारी सुद्धा पडू शकता