पुणे : बहुजननामा ऑनलाईन – दोन घरफोड्यामधून चोरट्यांनी 4 लाख रुपयांचा ऐवज चोरून (burglary in pune) नेला असून, वारजे (Warje Malwadi) आणि लोणीकंद (Lonikand) या भागात घटना घडल्या आहेत. पुणेकरांसाठी हे चोरटे डोकेदुखी ठरत असून, बंद दिसता त्यावर डल्ला (burglary in pune) मारला जात आहे.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
याप्रकरणी वारजे माळवाडी पोलीस ठाण्यात (Warje Malwadi Police Station) सोमनाथ वांजळे (वय 34) यांनी तक्रार दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वांजळे न्यू अहिरे गाव येथील एका सोसायटीत रहातात. दरम्यान काल दुपारी ते कामानिमित्त घराला कुलूप लावून बाहेत गेले होते. यादरम्यान चोरट्यांनी कुलूप उचकटून आत प्रवेश केला. तसेच बेडरूममध्ये घुसून दागिने आणि रोकड असा 2 लाख 71 हजात रुपयांचा ऐवज चोरून नेला आहे. हा प्रकार मंगळवारी दुपारी 12 ते सायंकाळी साडे सहा वाजण्याच्या सुमारास घडला आहे. अधिक तपास वारजे पोलीस (Warje Malwadi Police) करत आहेत.
Porn Film Case | राज कुंद्राची HotHit मधून दररोज होत होती ‘इतक्या’ लाखांची कमाई, पहा बँक डिटेल्स
तर दुसरी घटना वाघोलीत (wagholi) भागात घडली असून,
येथील एक गोडाऊन फोडत दीड लाख रुपयांचा ऐवज चोरून नेला आहे.
याबाबत लोणीकंद पोलीस ठाण्यात (Lonikand Police Station) रोहित पुरी (वय 32) यांनी तक्रार दिली आहे.
फिर्यादी यांचे बकोरी फाटा येथे कंपनीचे गोडाऊन आहे.
दरम्यान या ठिकाणी तीन चोरटे कारमध्ये आले.
त्यांनी गोडाऊनमध्ये शिरून लॅपटॉप आणि इतर इलेक्ट्रॉनिक वस्तू असा ऐवज चोरून नेला आहे.
अधिक तपास लोणीकंद पोलीस (Lonikand Police) करत आहेत.
Web Title :- Burglary in Pune | Burglary in Warje Malwadi and Wagholi area of Pune, Rs 4 lakh stolen from flats
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
Earthquake | काही तासात देशात 5 ठिकाणी भुकंपाचे धक्के; बिकानेर, मेघालय तीव्र धक्क्याने हादरला