पुणे न्यूज : बहुजननामा ऑनलाईन – पुणे शहरात घरफोड्या (burglary in pune) थांबत नसून विविध भागातील 5 फ्लॅट फोडून चोरट्यांनी लाखोचा ऐवज पळविला आहे. काही केले तरी या घटना थांबत नसल्याने पुणेकर घरफोड्यामुळे (burglary in pune) चिंतातूर झाले आहेत. पोलिसांना घरफोड्या रोखण्यात अद्याप तरी यश मिळालेले नाही.
Join our WhatsApp Group, Telegram, and facebook page for every update
याप्रकरणी खडक पोलीस ठाण्यात (Khadak Police Station) रोनक जैन (वय 38) Ronak Jain यांनी तक्रार दिली आहे. त्यानुसार अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल केला आहे. रोनक जैन (Ronak Jain) यांचे पुण्यात टिंबर मार्केट (timber market pune) येथे प्लाउड व हार्डवेअरचे दुकान आहे. दुकान बंद असताना अज्ञात चोरट्याने हात घालून छोट्या दरवाजाची कडी उघडत आत प्रवेश केला. तसेच, 92 हजार 755 रुपयांचा हार्डवेअरचा माल चोरुन नेला आहे. हा प्रकार गेल्या मंगळवारी सकाळी उघड झाला आहे. अधिक तपास खडक पोलीस (Khadak Police) तपास करत आहेत.
तर दुसरी घटना बुधवार पेठेतील (Budhwar Peth) एका लॉजमध्ये (Lodge) घडली आहे. याबाबत विरल शहा (वय 42) Viral Shah यांनी फरासखाना पोलीस ठाण्यात (faraskhana police station) तक्रार दिली आहे. येथे गुजरात लॉज (Gujarat Lodge) आहे. विरल शहा Viral Shah हे मुंबईचे (Mumbai) आहेत. ते कंपनीच्या कामानिमित्त पुण्यात (Pune) आले होते. यादरम्यान ते गुजरात लॉजला (Gujarat Lodge) थांबले होते. ते रूममध्ये झोपलेले असतानाही अज्ञाताने त्यांचे रूममध्ये प्रवेश केला. तसेच US डॉलर (US Dollar) तसेच रोकड असा ऐवज चोरला आहे. अधिक तपास फरासखाना पोलीस (faraskhana police) करत आहेत. तिसरी घटना स्वारगेट (Swargate) भागातील सॅलीसबरी पार्क (Salisbury Park) येथे घडली असून, प्रियंका जाधव (वय 35) Priyanka Jadhav यांचा बंद फ्लॅट अज्ञातांनी फोडत त्यातून 3 हजार 500 रुपयांचा ऐवज चोरून नेला आहे. हा प्रकार उघड झाल्यानंतर त्यांनी स्वारगेट पोलीस ठाण्यात (Swargate Police Station) तक्रार केली आहे.
तसेच, वारजे माळवाडीमध्ये (warje malwadi) देखील चोरट्यांनी ऑफिस फोडत 40 हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला आहे. याप्रकरणी निकेत शिंदे (वय 24) Niket Shinde यांनी तक्रार दिली आहे. त्यानुसार वारजे माळवाडी पोलीस ठाण्यात (warje malwadi police station) गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे. निकेत शिंदे Niket Shinde यांचे वारजे जकात नाका (Warje Zakat Naka) येथे ऐंटेक्स ट्रान्स्पोर्टएशनचे ऑफिस आहे. ते बंद होते. यादरम्यान अज्ञातांनी कुलूप तोडून आत प्रवेश केला. तसेंच लॅपटॉप व इतर ऐवज चोरुन नेला आहे. अधिक तपास वारजे माळवाडी पोलीस करत आहेत. तर पाचवी घटना ही विमाननगर (viman nagar) भागात घडली असून, बंद फ्लॅट फोडून तबल 2 लाख 85 हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला आहे. याबाबत विमाननगर पोलीस ठाण्यात (viman nagar police station) सविता कालरा (वय 67) Savita Kalra यांनी तक्रार दिली आहे. त्यानुसार अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी या 12 ते 28 जून या कालावधीत घराला कुलूप लावून कामानिमित्त बाहेर गावी गेल्या होत्या. याकाळात चोरट्यानी त्यांच्या घराचे कुलूप उचकटून आत प्रवेश केला. तसेच त्यांच्या घरातून सोन्याचे दागिने व रोकड असा ऐवज चोरून नेला आहे. हा प्रकार समोर आला असता त्यांनी पोलिसांकडे (Police) धाव घेत तक्रार दिली आहे. अधिक तपास विमाननगर पोलीस (viman nagar police) करत आहेत.
Web Titel : burglary in pune burglary in punes timber market budhwar peth salisbury park vimannagar and warje malwadi area
Join our WhatsApp Group, Telegram, and facebook page for every update