पुणे : बहुजननामा ऑनलाईन – शहरात चोरट्यांनी तीन Burglary फ्लॅट फोडत Burglary तबल 8 लाखांचा ऐवज पळविला आहे. पुणेकर गेल्या अनेक वर्षांपासून या चोरट्यांच्या दहशती खाली असून, या घटना रोखण्यात पोलीस अपयशी ठरत आहेत. चतुःश्रृंगी, खडकी आणि हडपसर भागात या घटना घडल्या आहेत.
याप्रकरणी निलेश नीलम गोठी (वय 45) यांनी चतु:शृंगी पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
गोठी यांचे दुकान आहे. त्यांचे मॉडेल कॉलनी येथील स्नेही कॉम्प्लेक्सवर तळ मजल्यावर गोडाऊन आहे.
यादरम्यान गोडाऊन कुलूप लावून बंद असताना मंगळवारी रात्री चोरट्यांनी गोडाऊन फोडले. तसेच दोन मायक्रोवेव दोन कुलर आणि दोन एसी असा 1 लाख 60 हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला आहे. काल सकाळी हा प्रकार समोर आला आहे. अधिक तपास चतु:शृंगी पोलीस करत आहेत.
तर दुसरी घटना खडकी बाजार येथे घडली असून, नीता कॉर्नर या इमारतीतील बंद फ्लॅट फोडून चोरट्यांनी 6 लाख 17 हजार रुपयांचा ऐवज चोरला आहे.
सोन्या चांदीचे दागिने व रोकड चोरीला गेली आहे. सेफ्टी दरवाज्याचे लॉक तोडून चोरट्यांनी आत प्रवेश केला व घरफोडी केली आहे.
याप्रकरणी भावेश शांतीलाल नहार (वय 41) यांनी खडकी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तर हडपसर येथील वेताळबाबा वसाहतीत जबरी चोरी करत 1 लाख 32 हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला.
याबाबत हडपसर पोलीस ठाण्यात ताराबाई बाळासाहेब नागे (वय 61) यांनी फिर्याद दिली आहे.
त्यांच्या घराचे लॉक तोडून आरोपीने घरात प्रवेश करत लोखंडी पेटीतून 76 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने चोरून नेले. अधिक तपास हडपसर पोलीस करत आहेत.
कृपया हे देखील वाचा:
बनावट पॅन कार्ड, आधारकार्ड बनवून तरुणाच्या नावावर 8 फायनान्स कंपन्यांमधून घेतले कर्ज; 8 लाखाची फसवणूक
व्हॅक्सीन सर्टिफिकेटमध्ये काही चूक असेल तर घरबसल्या करा सुधारणा, ‘ही’ आहे पद्धत
FIR on Hospitals | सरकारकडून 2 कोटी ‘गिळंकृत’ केल्यानंतर देखील रूग्णांना लुटणार्या 2 हॉस्पीटलवर FIR