बुलढाणा : बहुजननामा ऑनलाइन – Buldhana Poisoning Case | बुलढाण्यामध्ये (Buldhana) एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. यामध्ये भगर पीठ (bhagar flour) खाल्ल्याने गावातील अनेक लोकांना विषबाधा (Buldhana Poisoning Case) झाली आहे. सध्या या लोकांवर उपचार सुरु आहेत. गावातील बहुतांश दुकानदारांनी चिखलीमधून (Chikhali) माल घेतला होता. भगर पीठ खाल्ल्यामुळेच गावातील लोकांना हा त्रास झाला. त्यामुळं कोणत्या दुकानातून हे भगर पीठ आणले गेले होते. याचा तपास एफडीएच्या (FDA) अधिकाऱ्यांकडून करण्यात येत आहे. यानंतर या प्रकरणातील दोषींवर कारवाई करण्यात येईल.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
काय आहे संपूर्ण प्रकरण?
काल 21 सप्टेंबर रोजी एकादशी (Ekadashi) होती. त्यामुळे काल अनेक लोकांचा उपवास होता. ग्रामीण भागातील काही लोकांना उपवास असल्यामुळे त्यांनी भगर पीठ खाल्ला. यानंतर लोकांना काही वेळानंतर उलटी, डोकेदुखी, चक्कर येणे यासारखा त्रास सुरु झाला. हे भगर पीठ खाल्याने चिखली तालुक्यातील वेगवेगळ्या गावातील जवळपास 15 ते 20 लोकांना विषबाधा (Buldhana Poisoning Case) झाली. या सगळ्यानंतर खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
ज्या लोकांना हा त्रास झाला त्या लोकांनी आपल्याच गावातील किराणा दुकानातून हे भगर पीठ घेतले होते.
या गावातील दुकानदारांनी हे पीठ चिखली येथील दुकानदारांकडून विकत घेतले होते.
या संपूर्ण प्रकरणाचा तपास एफडीएचे अधिकारी करत आहेत. या प्रकरणाचा तपास पूर्ण झाल्यावर दोषींवर योग्य ती कारवाई केली जाईल.
Web Title :- Buldhana Poisoning Case | 20 people were poisoned by eating bhagar flour fda officials went to work
हे देखील वाचा :