कल्याण न्यूज :बहुजननामा ऑनलाइन – Builder Sanjay Gaikwad | नुकतीच मागील काही दिवसापूर्वी कल्याणमधील प्रसिद्ध बिल्डर संजय गायकवाड (Builder Sanjay Gaikwad) यांनी आठ कोटी रुपये किंमतीची रोल्स रॉईस कार (Rolls Royce car) विकत घेतली होती. याकारणाने ते चर्चेत असतानाच आता मात्र, कल्याण पूर्व मधील एका इमारतीमध्ये वीज (Electricity) चोरीचा आरोप त्यांच्यावर केला आहे. महावितरणाकडून संजय गायकवाड (Builder Sanjay Gaikwad) यांच्या विरोधात महात्मा फुले पोलीस ठाण्यामध्ये (Mahatma Phule Police station) वीज चोरीचा गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे. त्यांच्या विरोधात दिलेल्या तक्रारीत जवळपास 34 हजार 640 रुपयांची वीज चोरी झाल्याचे म्हटले आहे.
(case file against Kalyan famous builder Sanjay Gaikwad over power theft)
संजय गायकवाड काय म्हणाले?
वीज चोरी आरोपांनंतर संजय गायकवाड (Builder Sanjay Gaikwad) यांनी प्रतिक्रिया दिली आहे, सदर रक्कम भरली असल्याचं ते म्हणाले.
तर हे बदनामीचे षडयंत्र असल्याचा आरोप करत, याप्रकरणी माझ्यावर लावण्यात आलेले आरोप चुकीचे आहेत.
जर वीजचोरी झाली असेल, तर मग मीटर का नेलं नाही? असा सवाल देखील गायकवाड यांनी उपस्थित केला आहे.
पुढे बोलताना ते म्हणाले, ‘वीजचोरी नसून तडजोडीचं बिल होतं, मीटरचा एक फेज जळाल्यानं महावितरणचे अधिकारी साईड व्हिजिट करण्यास आले होते.
मीटरचा एक फेज बायपास असल्याचं त्यांचा निदर्शनास आलं, म्हणून महावितरणकडून तडजोडीचं बिल आकारण्यात आलं.
मात्र, बिल आम्हाला मिळालं नव्हतं, माझी विनाकारण बदनामी केल्याप्रकरणी महावितरणाविरोधात अब्रुनुकसानीचा दावा करणार असल्याचं संजय गायकवाड यांनी म्हटलं आहे.
काय आहे प्रकरण?
कल्याण पूर्व विभागातील कोळसेवाडी, आमराई तिसगाव भागात बांधकामाच्या ठिकाणी महावितरणाच्या भरारी पथकाला वीजमीटर (Electricity meter) टाळून विजेचा चोरटा वापर सुरु असल्याचे आढळून आले होते.
मात्र, याबाबत तपासणी करून चोरीच्या विजेचे 34 हजार 840 रुपयांचे देयक आणि पंधरा हजार रुपयांची तडजोड रक्कम भरण्यासंदर्भात वीज वापरणाऱ्या बिल्डर संजय गायकवाड यांना कळवले.
यांनतर काही काळानंतर कळवलेली रक्कम भरली नसल्याने गायकवाड यांच्याविरोधात कल्याणमधील महात्मा फुले पोलीस ठाण्यात (Mahatma Phule Police station) वीजचोरीची तक्रार दाखल केली. यावरून, संजय गायकवाड यांच्याविरुद्ध वीजचोरीचा गुन्हा दाखल झाला.
यांनतर संजय गायकवाड यांनी वीजचोरीचे 34 हजार 840 रुपयांचे देयक आणि तडजोडीची पंधरा हजार रुपयांची रक्कम (सोमवारी) महावितरणकडे भरली असल्याचे समजते.
Web Title : Builder Sanjay Gaikwad | kalyans famous builder sanjay gaikwad filed case of electricity theft.
Gold Price Today | सोनं पुन्हा 49 हजारपर्यंत, चांदी मात्र स्थिर; जाणून घ्या आजचे दर
Pune News | ‘मोक्का’मध्ये फरार असलेल्या पत्रकार देवेंद्र जैनला पुणे पोलिसांकडून अटक
Pune Crime News | एटीएम सेंटरमधून पैसे काढून देण्याच्या बहाण्याने ज्येष्ठ नागरिकाची 5 लाखाची फसवणूक