Bug In Whatsapp | व्हॉट्सअॅपमध्ये आलेल्या धोकादायक बग बाबत CERT ने जारी केला अलर्ट, डाटा लीक होण्याचा धोका
नवी दिल्ली : वृत्तसंस्था– Bug In Whatsapp | तुम्ही व्हॉट्सअॅप (WhatsApp) यूजर असाल तर सावधान. व्हॉट्सअॅपमध्ये अनेक धोकादायक बग आहेत. भारतीय सायबर एजन्सी इंडियन कॉम्प्युटर इमर्जन्सी रिस्पॉन्स टीम – आयएन (CERT-IN) ने बुधवारी याबाबत अलर्ट जारी केला. बग्जद्वारे, सायबर हल्लेखोर दूर राहून मालवेअर इन्स्टॉल करू शकतात. इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाच्या अखत्यारीत येणार्या सीईआरटी-आयएनने व्हॉट्सअॅपच्या अँड्रॉइड आणि आयओएस या दोन्ही व्हर्जनमध्ये मालवेअर इन्स्टॉल केले असल्याची भीती व्यक्त केली आहे. (Bug In Whatsapp)
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
व्हिडिओ कॉलद्वारे किंवा यूजर्सना व्हिडिओ फाईल्स पाठवून मालवेअर इन्स्टॉल केले जाऊ शकते. यामुळे युजर्सचा डेटाही लीक होऊ शकतो. आयएनने व्हॉट्सअॅप यूजर्सना नवीन सुरक्षा अपडेट इन्स्टॉल करण्याचा सल्ला दिला आहे.
WhatsApp ही आंतरराष्ट्रीय स्तरावर उपलब्ध फ्रीवेअर, क्रॉस-प्लॅटफॉर्म सेंट्रलाईज्ड इन्स्टंट मेसेजिंग (आयएम) आणि व्हॉइस-ओव्हर-आयपी (व्हीओआयपी) सेवा आहे. ज्याची मालकी अमेरिकन कंपनी Meta Platforms कडे आहे. हे यूजर्सला टेक्स्ट आणि व्हॉइस मेसेज पाठविण्यास, व्हिडिओ कॉल करण्यास आणि फोटो, दस्तऐवज, लोकेशन आणि इतर सामग्री शेअर करण्यास अनुमती देते. (Bug In Whatsapp)
WhatsApp चे क्लायंट अॅप्लिकेशन मोबाईल डिव्हाईसवर चालते आणि संगणकावरून अॅक्सेस करता येते.
सर्व्हिससाठी साइन अप करण्यासाठी एका सेल्युलर मोबाइल फोन नंबरची आवश्यकता असते.
जानेवारी 2018 मध्ये, व्हॉट्सअपने WhatsApp Business नावाचे स्टँडअलोन बिझनेस अॅप जारी केले जे मानक व्हॉट्सअॅप क्लायंटशी संवाद साधू शकते. एका अहवालानुसार, एकट्या भारतात व्हॉट्सअॅपचे सुमारे 50 कोटी यूजर्स आहेत.
Web Title :- Bug In Whatsapp | cert issued alert regarding dangerous bug in whatsapp threat of data leak hovered
हे देखील वाचा :
Pune Crime | मुलाकडून आईच्या खूनाचा प्रयत्न, लोणीकाळभोर परिसरातील घटना



Comments are closed.