नवी दिल्ली : वृत्तसंस्था – मागच्या वर्षी मिळालेल्या कॉर्पोरेट टॅक्समधील सवलतीनंतर आता सर्वांचे लक्ष केंद्रीय अर्थसंकल्पात वैयक्तिक इन्कम टॅक्समध्ये मिळणार्या सवलतीकडे लागले आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांच्या खजिन्याची स्थिती पाहता याबाबतीत त्या कोणतं पाऊल उचलतात हे अर्थसंकल्प सादर झाल्यानंतरच समजू शकेल. परंतु, तज्ज्ञांच्या माहिती नुसार असे झाले नाही तर सरकार अन्य मार्गाने वैयक्तिक इन्कम टॅक्समध्ये दिलासा देऊ शकते. विमा क्षेत्रात गुंतवणूक केल्यानंतर मिळणार्या कर सवलतीमध्ये मोठा पर्याय दिला जाऊ शकतो. विशेष करून काही निवडक योजनांबाबत हे पाऊल उचलले जाऊ शकते.
Term Insurance मध्ये गुंतवणुकीला प्रोत्साहन
टर्म इन्श्युरन्स प्लानमध्ये गुंतवणुकीला प्रोत्साहन देण्यासाठी सरकार व्यक्तिगत आयकरमधील सवलत वाढवू शकते. एगॉन लाइफ इन्श्युरन्सचे एमडी व सीईओ विनीत अरोड़ा यांचे म्हणणे आहे की, हे प्लान केवळ स्वस्त नसून ग्राहकांसाठी खुप उपयुक्त आहेत. सरकारला अशा प्लानमध्ये गुंतवणूक केल्यानंतर 25,000 रुपयांच्या अतिरिक्त सवलतीची तरतूद केली पाहिजे. लोकांमध्ये विम्याबाबत जागृती करण्यासाठी विमा विनियामक आणि विकास प्राधिकरणसुद्धा सतत टर्म विमा प्लानला प्रोत्साहित करत आहेत. सध्या विम्यामध्ये दिड लाखांच्या गुंतवणुकीवर आयकर अधिनियम कलम 80-सी अंतर्गत व्यक्तिगत आयकरमध्ये सवलतीची तरतूद आहे.
रिटायरमेन्ट बेनिफिटला टॅक्स फ्री करण्याचा पर्याय
सरकारजवळ एक पर्याय सर्व प्रकारच्या रिटायरमेन्ट बेनिफिटला टैक्स फ्री करण्याचा आहे. याच प्रमाणे कॉर्पोरेट टॅक्समध्ये झालेल्या कपातीच्या बाहेर राहिलेल्या छोट्या व्यावसायिकांना सरकार व्यक्तिगत आयकरमध्ये सवलत देऊ शकते. हा दिलासा त्यांनी केलेल्या गुंतवणुकीवर आधारित असू शकतो. ब्रिकवर्क रेटिंगनुसार सरकारच्या समोर सर्वात मोठे आव्हान अर्थव्यवस्थेत मागणी वाढविणे हे आहे. परंतु, असे केल्यास सरकारसमोर आणखी काही आव्हाने निर्माण होऊ शकतात. यासाठी मागणी वाढविण्यासाठी त्याच क्षेत्रांवर सध्या लक्ष दिले पाहिजे ज्यांची तिथे जास्त आवश्यकता आहे. यामध्ये इन्फ्रास्ट्रक्चर, ऑटोमोबॉइल, पॉवर, टेलीकॉम, स्टील आणि रियल एस्टेट ही प्रमुख क्षेत्र आहेत. अर्थव्यवस्थेचा वेग वाढविणे आणि रोजगार वाढविणे यामध्ये या सर्व क्षेत्रांची महत्वाची भूमिका असते.
Visit : bahujannama.com