बहुजननामा ऑनलाइन टीम – नवी दिल्ली : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांनी आज (सोमवार) सादर केले. यामध्ये त्यांनी विविध तरतूदींची घोषणा केली. सरकारकडून इन्व्हेस्टमेंट चार्टरची स्थापना करण्याची तयारी दर्शवली. हे चार्टर फायनान्शियल सेक्टरच्या सर्व उत्पादनांच्या गुंतवणुकीसंदर्भात असेल.
कोरोना व्हायरसमुळे यंदाचे बजेट विशेष आहे. असे असले तरी मध्यमवर्गीय आणि सर्वसामान्य जनतेच्या दृष्टीने अनेक घोषणा या बजेटमध्ये केल्या आहेत.
या बजेटमधील अशा काही गोष्टी आहेत त्या तुमचे आर्थिक गणित बिघडवू शकतील…
ज्येष्ठ नागरिकांना ITR भरणे नाही गरजेचे
फक्त पेन्शन आणि व्याजावर उत्पन्न असलेल्या 75 वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्या लोकांना टॅक्स रिटर्न (Income Tax Return) भरण्याची गरज नाही.
डिपॉझिट इन्शुरन्स कव्हर होणार सोपं
अर्थमंत्री सीतारमन यांनी सांगितले, की सरकार आणि रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) चांगल्या गुंतवणूक रकमेसाठी मर्यादेची तयारी करत आहे. गेल्या वर्षी सरकारने डिपॉझिट विमा कवच एक लाख रुपयांनी वाढवून 5 लाख रुपये केले होते.
सामाजिक सुरक्षेची मर्यादा वाढली
कोविड-19 महामारीमुळे नोकरी गमावलेल्या फ्रीलान्सची कामे करणाऱ्या लोकांसाठी अर्थसंकल्पात मोठा दिलासा मिळाला आहे.
फेसलेस ऍसेसमेंट
2021 च्या अर्थसंकल्पात फेसलेस मूल्यांकनाला प्रोत्साहन देण्यात आले आहे. काही वादांवर तोडगा काढण्यासाठी एका समितीची स्थापना केली गेली आहे. 50 लाखांपर्यंत उत्पन्न असलेल्या आणि 10 लाख रुपये वादाची रक्कम असलेल्या लोकांना या समितीकडे संपर्क करता येऊ शकेल.
आर्थिक उत्पादनांसाठी इन्व्हेस्टमेंट चार्टर
आर्थिक उत्पादनांसाठी चुकीची विक्री कमी करण्यासाठी निर्मला सीतारमन यांनी एक इन्व्हेस्टमेंट चार्टरची स्थापना करण्याची बाब सांगितली.
कर प्रकरणाच्या वादावर लवकरच तोडगा
आयकर रिटर्ननुसार, मूल्यांकन पुन्हा सुरु करण्याच्या मर्यादा कमी केली आहे. ही मर्यादा 6 वर्षांनी कमी करून 3 वर्षे केली आहे. कर वादाच्या प्रकरणावर लवकरच तोडगा काढण्याची शक्यता आहे.
टॅक्स फॉर्म्स भरले जाणार
निर्मला सीतारमन यांनी सांगितले, की कॅपिटल गेन्स, बँक आणि पोस्ट ऑफिसच्या व्याजची माहिती भरली असेल. त्यामुळे करदात्यांना आपला टॅक्स भरण्यासाठी कमी वेळ लागेल.
गृहकर्जाच्या व्याजावरील सूट वाढवली
गृहकर्जाच्या व्याजावरील सूट वाढवली आहे. त्यामुळे परवडणाऱ्या घरांची खरेदी वाढेल. तसेच डिडक्शनचा जे कोणी फायदा घेतात त्यांना या नियमांचा फायदा होईल.
गुंतवणूकदाराची नवी जागा
गुंतवणूकदारांना गुंतवणुकीचा आणखी एक पर्याय मिळणार आहे. मात्र, यासंदर्भात आणखी माहिती मिळणे बाकी आहे.
NRIs मिळणार फायदा
अनिवासी भारतीयांसाठी (NRI) काही बदल केले गेले. जे करदाते कर भरूनही फायद्यापासून अडचणींचा सामना करत आहेत, त्यांना आता दिलासा मिळणार आहे.