नागपूर : बहुजननामा ऑनलाईन – लोकसभा निवडणुकीच्या नामांकनासाठी ४८ तास शिल्लक असताना बहुजन समाज पक्षाकडून उमेदवारांची शोध मोहीम सुरू आहे. तसेच प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीचे नागपूरसह सर्व उमेदवारांच्या नावाची आज घोषणा होण्याची शक्यता आहे.
बसप आणि वंचित बहुजनआघाडीच्या लोकसभेच्या उमेदवारांची यादी अद्याप जाहीर न झाल्याने राजकीय भाकिते करणे कठीण झाले आहे. महाराष्ट्रामध्ये बसप आणि समाजवादी पक्षाची आघाडी झाली आहे. सपा ४ जागांवर लढणार आहे. तर ४४ जागांवर बसपाचे उमेदवार उभे करण्याचे ने जाहीर केले. नागपूरसह विदर्भातील भंडारा. चंद्रपूर हे मतदारसंघ पक्षाच्यादृष्टीने महत्त्वाचे आहेत.
बसपची शनिवारी सायंकाळी किंवा रविवारी यादी जाहीर होण्याची शक्यता आहे. तसेच वंचित बहुजन आघाडीकडून नागपूरचा उमेदवार जाहीर होण्याची शक्यता आहे. असा अंदाज व्यक्त केला जातो. या दोन्ही पक्षाच्या उमेदवारावर राजकीय समीकरण अवलंबून आहे. मतविभाजन होते कि त्याचा फटका कुणाला बसेल. हे गणितही अद्याप जुळवता आलेले नाही. बसप आणि वंचितचे उमेदवार जाहीर झाल्यानंतर रविवारी सायंकाळी नवीन समीकरणानुसार मोर्चेबांधणी होण्याचे संकेत आहेत.