लखनऊ : वृत्तसंस्था – लोकसभा निवडणुकीच्या धक्कादायक निकालानंतर आता मायावती यांना पक्षात महत्त्वाचे पेरबदल केले आहेत. मायावतींनी त्यांचा भाऊ आनंद कुमार यांच्यावर पक्षाच्या उपाध्यक्षपदाची जबाबदारी सोपावली आहे, तर पुतण्या आकाशकडे आनंदला राष्ट्रीय समन्वयक बनवले आहे. उत्तर प्रदेशच्या लखनऊमध्ये आज पार पडलेल्या बहुजन समाज पक्षाच्या महत्त्वपूर्ण बैठकीत त्यांनी हे पेरबदल केल्याचे जाहीर केले आहे. मायावतींनी लोकसभा निवडणुकीनंतर पहिल्यांदाच देशभरातील पक्षाच्या नेत्यांची, पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली होती.
आकाश सोबतच गौतम यांच्याकडेही समन्वयक पदाची जबाबदारी असणारे आहेत. गौतम यांच्याकडे पुर्वी उपाध्यक्षपदाची जबाबदारी होती. मायावती यांनी पक्षात अनेक फेरबदल करताना दानीश अली यांना लोकसभेतील बसपाचे नेते बनविले तर जौनपूरमधील खासदार श्याम सिंह यादव यांना लोकसभेतील पक्षाच्या उपनेतेपदी बसवण्यात आले आहे. तर पक्षाचे ज्येष्ठ नेते सतीश चंद्र मिश्रा हे राज्यसभेतील बसपाचे नेते राहणार असल्याची घोषणा केली.
मायावतींनी भावाला राष्ट्रीय उपाध्यक्ष तर पुतण्याला राष्ट्रीय समन्वयकाची मोठी जबाबदारी दिल्याने बसपातही घराणेशाही सुरू झाल्याची चर्चा सुरू झाली आहे. मायावतींनी लोकसभा निवडणुकीनंतर पहिल्यांदाच देशभरातील पक्षाच्या नेत्यांची, पदाधिकाNयांची बैठक बोलावली होती. बैठकीसाठी आलेल्या नेत्यांना, कार्यकत्र्यांना आपली बॅग, मोबाइल फोन, पेन, कारच्या चाव्या बैठकीच्या खोलीबाहेर ठेवाव्या सांगण्यात आले होते. २०१४ च्या निवडणुकीत एकही जागा न मिळवणाNया बसपाला या लोकसभा निवडणुकीत तब्बल १० जागा मिळाल्या आहेत. मात्र मोदी सरकारला पुर्ण बहुमत मिळाल्याने मायावतींचे विंâगमेकर होण्याचे स्वप्न भंगले आहे.
तरी देखील लोकसभेत मिळालेल्या यशाने कार्यकत्र्यांचा उत्साह वाढला आहे. पुढील वर्षी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत पक्षाला चांगले यश मिळावे यासाठी त्यांनी कार्यकत्र्यांना आतापासून कामाला लागण्याचे आदेश ही मायावतींनी या बैठकीत दिले आहेत. उत्तर प्रदेशातील १२ विधानसभेच्या पोटनिवडणुका बसपा स्वतंत्रपणे लढणार असल्याची घोषणा मायावती यांनी नुकतीच केली होती. या ठिकाणी कोणाला उमेदवारी द्यायची यावरही बैठकीत चर्चा झाली असून अंतिम यादी लवकरच तयार करण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.