नवी दिल्ली : वृत्तससंस्था – बीएसएनएल कंपनीने एक नवीन प्लान तयार केला आहे. आता १२ डेटा अॅड ऑन असा प्लान बीएसएनएलने जाहीर केला आहे. हि एक यूजर्ससाठी चांगली बातमी बीएसएनएलने दिली आहे. यामध्ये युजर्संना नियमित अधिक डेटा मिळणार आहे. जे यूजर्स BSNLचे पोस्टपेड प्लानचा वापर करत आहेत आणि जर मोबाईल डेटाचा वापर अधिक पाहिजे असल्यास या प्लानचा उपयोग होणार आहे. तर यामध्ये ३६५ दिवसांचा वार्षिक प्लानआणला आहे, युजर्संना महिन्याला १ GB GB data मिळतो. या प्लानचा काय फायदा मिळणार आहे. हे जाणून घ्या.
तर बीएसएनएल पोस्टपेड डेटा अॅड-ऑन प्लानची किंमत ५० रुपयांपासून सुरू होते. ज्यामध्ये युजर्संना ५५० MB Data मिळतो. हा डेटा पूर्ण झाल्यानंतर त्याची गती कमी होऊन ती ४० Kbps होते. मात्र युजर्संना व्हाइस कॉलिंग आणि SMS फायदा मिळत नाही. तर BSNL चा ७५ रुपयांचा प्लान आहे. यामध्ये १.५ GB data मिळतो. मुदत संपल्यानंतर गती कमी होऊन 40 Kbps होते. १७० रुपयांच्या प्लानवर युजर्संना २.२ GB data मिळतो. नंतर गती कमी होऊन 40 Kbps होते. तसेच इतर टेलिकॉम कंपन्या आपल्या पोस्टपेड युजर्ससाठी फक्त २ Data add-on plan ऑफर करीत आहे. मात्र BSNL चे प्लान भरपूर आहेत.
दरम्यान, यामध्ये २२५ रु. प्लानमध्ये ४.२ GB data याची गती संपल्यानंतर 40 Kbps होते. २४० रु. प्लानमध्ये युजर्संना ३.५ GB data मिळतो. तर युजर्ससाठी २२५ रुपयांचा डेटा प्लान अधिक फायदेशीर आहे. BSNL च्या २९० च्या डेटा प्लानमध्ये युजर्संना ९ GB data मिळतो. तर ३४० रुपयांच्या प्लानमध्ये केवळ ५.५ जीबी डेटा मिळतो. BSNL च्या ५०१च्या डेटा प्लानमध्ये युजर्संना १२ GB data तर ५४९ च्या प्लानमध्ये १६ GB data तसेच या प्लानमध्ये ६६६मध्ये ११ GB data तर ९०१ मध्ये २० GB data मिळतो. डेटाची मुदत झाल्यानंतर गती कमी होऊन १२८ Kbps एवढी होते. या गतीवर मेसेज आणि सोशल मीडिया वापर होऊ शकतो. तसेच BSNL च्या १७११ मध्ये प्लानमध्ये युजर्संना ३० GB data मिळतो. असा उपयुक्त असणारा प्लान BSNL ने आणला आहे.