नवी दिल्ली : वृत्तसंस्था – देशातील सरकारी टेलिकॉम कंपनी भारत संचार निगम लिमिटेडने (BSNL) आपल्या युजर्ससाठी एक जबरदस्त ब्रॉडबँड प्लान आणला आहे. Airtel आणि Reliance Jio या दोन्ही कंपन्यांना टक्कर देण्यासाठी BSNL ने हा प्लान आणला आहे. या प्लानमध्ये युजर्संना 3300 जीबी डेटा आणि मोठी वैधता मिळणार आहे.
Keralatelecom च्या रिपोर्टनुसार, प्रत्येक घरात इंटरनेट पोहोचवण्यासाठी BSNL ने जबरदस्त ब्रॉडबँड प्लान आणला आहे. BSNL या ठिकाणी भारत फायबर ब्रॉडबँड अंतर्गत फायबर बेसिक प्लान देत आहे. या प्लानचे खास वैशिष्ट्ये म्हणजे दुसऱ्या टेलिकॉम ऑपरेटर्स पेक्षा खूपच स्वस्त आहे. म्हणजेच फक्त 449 रुपयांमध्ये इंरटनेची मजा घेता येणार आहे. अन्य टेलिकॉम कंपनी 1 महिन्याची वैधता देतात तर यात तुम्हाला 3 महिन्यांची म्हणजेच 90 दिवसांसाठी दमदार ऑफर्स मिळतात. BSNL च्या या प्लानअंतर्गत घरात कनेक्शन घ्यायचे असल्यास कोणतेही इंस्टॉलेशन चार्ज द्यावे लागणार नाही. मिळालेल्या माहितीनुसार, युजर्संना यात 30Mbps ची स्पीड मिळणार आहे. सुरूवातीचे 3 महिने एकूण 3300 जीबी डेटा दिला जाईल. या ब्रॉडबँड प्लान सोबत ग्राहकांना आणखी एक फायदा मिळणार आहे. तो म्हणजेच टेलिफोन लाइनचा. या फोनवरून 3 महिन्यांपर्यंत कोणत्याही नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंग करू शकता. ब्रॉडबँड कनेक्शनची ही ऑफर केवळ 3 महिन्यासाठी आहे. याची वैधता संपल्यानंतर युजर्संना महिन्याला 599 रुपये द्यावे लागतील.