नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारत संचार निगम लिमिटेडने (BSNL) आपल्या ग्राहकांसाठी 151 रुपयांचा एक नवा कोरा प्लॅन लॉन्च केला आहे. या प्लॅनला विग कमांडर अभिनंदनचे नाव देण्यात आले आहे. या प्लॅनचे नाव ‘Abhinandan 151’ ठेवण्यात आले आहे. या प्लॅनमध्ये यूजर्सला रोज 1 जीबी डेटा आणि 100 SMS मिळणार आहेत. 24 दिवसांसाठी या प्लॅनची वॅलिडिटी राहणार आहे. 24 दिवसांपर्यंत लोकल, एसटीडी आणि रोमिंगची कॉलिंग फ्री असणार आहे.
असा सब्सक्राइब करणार प्लॅन
हा प्लॅन सब्सक्राइब करण्यासाठी BSNL यूजर्सला आपल्या फोनमध्ये PLAN 151 टाईप करावे लागेल आणि हा मेसेज 123 वर सेंड करावा लागेल, या प्लॅनला चेन्नई आणि तमिळनाडूसाठी लॉन्च करण्यात आले होते, मात्र, दिल्ली आणि मुंबईतील यूजर्स देखील याचा लाभ घेऊ शकतात.
बालाकोटमध्ये इंडियन एअरफोर्सने केलेल्या एअर स्ट्राइकच्या कारवाईनंतर पाकिस्तानने F-16 हे विमान घेऊन भारतीय सीमेत घुसखोरी केली होती. याच्या विरोधात एअरफोर्स कडून कठोर कारवाई करत प्रतिउत्तर देण्यात आले, यात विंग कमांडर अभिनंदनने F-16 या पाकिस्तानी विमानाला पाडले. यात त्याचे विमानचा दुर्घटनेत सापडले, ते पॅरिशूटच्या मदतीने विमानतून खाली उतरत होते, मात्र त्यांचे पॅरेशूट पाकिस्तानात लँड झाले, त्यानंतर त्यांना पाकिस्तानी सैन्याने ताब्यात घेतले होते आणि 24 तासाने पाकिस्तानने अभिनंदन यांना परत भारताकडे सोपावले. त्यानंतर आता BSNL ने त्यांच्या नावे आपल्या ग्राहकांसाठी हा प्लॅन लॉन्च केला आहे.