मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – सध्याच्या काळात प्रत्येकजनाला दीड जीबी डेटा दिवसाला पुरत नाही. त्यासाठी तुम्ही फक्त ९६ रुपयांच्या रिचार्जवर दररोज १० जीबी डेटा मिळवू शकतात. हा प्लॅन २८ दिवसांसाठी ९६ रुपयांचा रिचार्जवर आणि ८४ दिवसांसाठी २३६ रुपयांचा रिचार्जवर मिळत आहे.
बीएसएनएलने त्यांच्या ग्राहकांसाठी कमी दरात जास्त डेटा देण्यासाठी हे दोन प्रीपेड प्लॅन लॉन्च केले आहेत. इतर प्लॅन्सच्या तुलनेत यामध्ये सर्वाधिक डेटा मिळतो. या प्लॅन मध्ये तुम्हाला दिवसाला १० जीबी डेटा मिळणार आहे. तुम्हाला या प्लॅनमध्ये ९६ रुपयांत २८० जीबी डेटा तर २३६ रुपयांत ८४० जीबी डेटा मिळणार आहे. यामध्ये ग्राहकांना फक्त डेटा मिळणार आहे. कॅलिंग आणि मॅसेजिंगसाठी वेगळे रिचार्ज करावे लागणार आहे.
सध्या महाराष्ट्रातील काही भागा मध्येच हा प्लॅन सुरु करण्यात आला आहे. कारण बीएसएनएलची 4G सेवा सर्वत्र उपलब्ध नाही. त्यामुळे ज्याठिकाणी ही सेवा उपलब्ध आहे त्याठिकाणी ही सेवा उपलब्ध करण्यात आली आहे. दरम्यान, या आधी बीएसएनएलने नुकताच एक वार्षिक प्लॅनही जाहीर केला होता. त्या प्लॅनमध्ये अॅमेझॉन प्राइमचं मोफत सबस्क्रिप्शन देण्यात येणार आहे. हा प्लॅन ३९९ रुपयांना असणार आहे. एक वर्षाच्या अॅमेझॉन प्राइम सबस्क्रिप्शनची किंमत ९९ इतकी आहे. ग्राहकांना एक वर्षासाठी प्राइम सबस्क्रिप्शन दिले जाणार आहे.