नवी दिल्ली : वृत्तसंस्था – सरकारी टेलिकॉम कंपनी बीएसएनएलकडून 499 रुपयांच्या प्री-पेड प्लॅनमध्ये बदलाची घोषणा करण्यात आली आहे. हा बदल देशभरात आज म्हणजे 1 जून 2021 पासून लागू होईल. अशावेळी या प्लॅनमध्ये यूजर्सला रोज जास्त डेटाचा फायदा मिळेल. सोबतच बीएसएनएलकडून जास्त डेटासाठी या प्लॅनच्या इतर सुविधांमध्ये कोणतीही कपात करण्यात आलेली नाही. अशावेळी बीएसएनएल यूसर्जना आजपासून 499 रुपयांच्या प्लॅनमध्ये 1जीबीच्या ऐवजी रोज 2जीबी डेटा मिळेल. या प्लॅनची वैधता 90 दिवसांची आहे. या प्लॅनबाबत सविस्तर जाणून घेवूयात –
बीएसएनएलचा 499 रुपयांचा प्लॅन
टेक वेबसाइट ओन्ली टेकच्या रिपोर्टनुसार, बीएसएनएलचा 499 रुपयांचा प्लॅन 90 दिवसांच्या वैधतेसह येतो. या प्लॅनमध्ये अजूनपर्यंत यूजर्सला 1जीबी डेटा ऑफर केला जात होता. परंतु आजपासून बीएसएनएलच्या 499 रुपयांच्या प्लॅनमध्ये यूजर्सला रोज 2जीबी डेटा ऑफर केला जाईल. याशिवाय यूजर्सला या प्लॅनमध्ये पहिल्या प्रमाणेच अनलिमिटेड कॉलिंगचा आनंद घेता येईल. जो विशेषकरून दिल्ली आणि मुंबईसाठी असेल. तर रोज 100एसएमएसची सुविधा मिळेल. याशिवाय झींग म्यूझिकचे मोफत सबस्क्रीप्शन मिळेल.
मात्र, जर तुम्ही 31 मे च्या अगोदर बीएसएनएलचा 499 रुपयांचा प्री-पेड प्लॅन रिचार्ज केला आहे, तर रोज 2जीबी डेटाचा फायदा मिळणार नाही. 31 मे च्या अगोदरच्या रिचार्जवर पहिल्या प्रमाणे 1जीबी डेटाच मिळत राहील.
लोणीकंद परिसरातून जबरी चोरी करून पसार झालेल्यांच्या टोळीला गुन्हे शाखेकडून अटक, 7.25 लाखाचा ऐवज जप्त
भाजपच्या खासदाराचा घरचा आहेर, म्हणाले – ‘मोदी सरकारनंही देशाच्या अर्थव्यवस्थेचा विचकाच केला’
धक्कादायक ! बीलावरुन ‘कोरोना’मुक्त महिलेला पती आणि मुलीकडून मारहाण, चाकूनं केला हल्ला, FIR दाखल
’10 टक्के EWS आरक्षण मोदी सरकारनं दिलं, कर्तव्यशून्य हा आघाडीचा परिचय’