नवी दिल्ली :वृत्तसंस्था – BSNL | भारत संचार निगम लिमिटेड (BSNL) आपल्या कोट्यावधी ग्राहकांसाठी अनेक वेगवेगळे प्लान (BSNL plan) देत असते. हा प्लान बीएसएनएल ग्राहकांसाठी अतिशय फायदेशीर आणि उपयुक्त असणार आहे. सध्या प्रचलित असणारे Airtel, Jio आणि Vodafone Idea या देखील कंपन्या आपल्या ग्राहकांना विविध प्लान देत असतो. पण यामध्ये बहुतांश प्लानमध्ये वैधता ही कमी असते. तर, BSNL ने आणलेल्या नव्या प्लानची किंमत 40 रुपयांपेक्षा कमी आहे. तसेच या प्लानची वैधता 15 दिवस (15 days) असणार आहे. या प्लानविषयी जाणून घ्या.
36 रुपयांचा प्रीपेड प्लान –
BSNL च्या 36 रुपयांच्या प्रीपेड प्लानमध्ये आपल्या ग्राहकांना 36 रुपयांचा टॉकटाइम दिला जाणार आहे. तसेच, यामध्ये बीएसएनएल ते बीएसएनएल कॉलिंगसाठी 250 मिनिटे उपलब्ध आहेत. दिलेला टॉकटाइम अन्य नेटवर्कवर कॉल करण्यासाठी वापरला जाऊ शकतो. यासाठी प्रतिसेकंद 1 रुपये 1 पैसे शुल्क आकारले जाते.
या प्लानमध्ये दररोज वापरासाठी 200 MB Data दिले जाणार आहे. दिवसांसाठी 200 MB Data तुम्हाला वापरता येणार आहे.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
दरम्यान, 40 रुपयांपेक्षा कमी किमतीमधील हा एक बेस्ट प्लान आहे.
बीएसएनएलच्या या प्लानमध्ये मोफत SMS उपलब्ध नाही.
मात्र 5 पैसे प्रति SMS दराने एसएमएस सुविधा उपलब्ध आहे.
तसेच, इतर टेलिकॉम कंपन्या 100 रुपयांपेक्षा कमी किमतीत मोफत SMS चा लाभ देखील देत नाहीत.
Web Title : BSNL | bsnl thirty six rupees recharge pack read details.
Tulsi Vivah 2021 | तुळशी विवाहात करा ‘या’ मंत्राचे आणि मंगलाष्टकांचे पठन, मिळेल ‘सुख-सौभाग्य’