नवी दिल्ली : वृत्तसंस्था – माणुसकीला लाजविणारे आश्चर्यकारक प्रकरण बिहारमधून समोर आले आहे. मुंगेर येथील एका लहान मुलाच्या पोटावर धारधार हत्याराने वार करून त्याला फेकून देण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पहिल्यांदाच डोळ्यांसमोर काय होते हे पाहिल्यानंतर लोकांना विश्वास वाटला नाही. मुलाचे पोट पूर्णपणे मध्यभागी फाटलेले होते, ज्यामुळे मुलाचे यकृत आणि आतडे सर्व बाहेर आले. हे पाहून लोक चकित झाले. पोलिस वेळेवर पोहोचले आणि ग्रामस्थांच्या मदतीने मुलाला आरोग्य केंद्र तारापूर येथे नेण्यात आले.
त्या मुलाला फेकल्यानंतर त्याच्या पोटातील आतडे आणि इतर अवयव अक्षरश: पोटाच्या बाहेर आले होते. त्यामुळे ग्रामस्थांच्या तत्परतेने या मुलाचे प्राण वाचले. त्याला दवाखान्यात भरती करण्यात आल्यानंतर त्याच्यावर उपचार करून त्याचे अवयव पुन्हा व्यवस्थित करण्यात आले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोनडीहा तांती टोला येथील कृष्णा तांती हे पेशाने मिस्त्री असून ते कामावर गेले होते. त्याची पत्नी घरातच स्वयंपाक करत होती. त्याचा दीड वर्षांचा मुलगा आशिष कुमार घराच्या पोर्चवर खेळत होता. अचानक मुलाचा आवाज ऐकून लोक धावले. आणि त्यानंतर त्या मुलाला भयंकर अवस्थेत पहिले. त्यामुळे नागरिकांमध्ये मुलं चोरणाऱ्या टोळीची अफवा पसरली. मात्र काही वेळातच ही अफवा खोटी असल्याचे गावकऱ्यांनी मान्य करून या मुलाला उपचारासाठी दवाखान्यात हलवले. दरम्यान, विविध प्रकारची चर्चा विचारात घेऊन पोलिस या घटनेचा तपास करत आहेत.
Visit : bahujannama.com