पुणे : बहुजननामा ऑनलाइन – अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम कराचीचतच असल्याचं पाकिस्तानने कबूल केलं आहे. त्यामुळे दाऊदला कोणत्याही परिस्थितीमध्ये भारतात आणा अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी केली आहे. रोहित पवार यांनी ट्विट कर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे मागणी केली आहे.
Now that Pakistan has accepted Dawood Ibrahim is indeed in Karachi, I would request Hon'ble PM @narendramodi ji to do everything possible for bringing him to justice.
Let's get him on Indian Soil at any cost.— Rohit Pawar (@RRPSpeaks) August 23, 2020
दरम्यान, पाकिस्तानने पहिल्यांदाच दाऊद पाकिस्तानात असल्याची कबुली दिली आहे. आंतरराष्ट्रीय दहशतवादाला रसद पुरवणाऱ्यांवर देखरेख ठेवणाऱ्या फायनान्शियल अॅक्शन टास्ट फोर्स या संस्थेच्या ग्रे लिस्टमधून बाहेर येण्यासाठी पाकिस्तानची धडपड सुरु आहे. पाकिस्तानने 88 दहशतवादी संघटनांवर, व्यक्तींवर बंदी, निर्बंध घातले आहेत. त्याबाबतची यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. यामध्ये दाऊद इब्राहिमचा पत्ता देण्यात आला आहे. दाऊद इब्राहिम व्हाईट हाऊस, सौदी मशीदजवळ, क्लिफ्टन, कराची येथे वास्तव्यास आल्याचे पाकिस्तानने म्हटले आहे. त्यामुळे दाऊद पाकिस्तानात असल्याचा दावा भारताने केल्यानंतर दाऊत पाकिस्तान हा दावा फेटाळून लावत होता. मात्र, आता फायनान्शियल अॅक्शन टास्ट फोर्सच्या कार्यवाहीमुळे पाकिस्तानचा खरा चेहरा समोर आला आहे.
लकडावालाने दाऊदचे 2 पत्ते पोलिसांना दिले होते
दाऊद पाकिस्तानातच असल्याचे समोर आल्यानंतर भारतीय मीडियाने याचे वृत्त ठळक पणे प्रसिद्ध केले होते. यानंतर पाकिस्ताने हे वृत्त फेटाळून लावत कांगावा केला. त्यामुळे पाकिस्तानचा खोटारडेपणा आंतरराष्ट्रीय स्तरावर पुन्हा एकदा उघडा पडला. दाऊदचा एकेकाळचा विश्वासू साथीदार एजाज लकडावालाने मुंबई पोलिसांच्या चौकशीत जानेवारीमध्ये दाऊद कराचीत असल्याची माहिती दिली. तसेच त्याने दाऊदच्या दोन घरांचे पत्ते पोलिसांना दिले होते.