बहुजननामा ऑनलाईन : हुंडा घेण्याचे प्रमाण आज काल कमी होत असले तरी हुंड्यासाठी अत्त्याचार केल्याच्या घटना समोर येताच आहेत. अनेकदा हुंडा न दिल्यामुळे मुलीचा छळ केला जातो तर कधी तिचा जीव देखील घेतल्या जातो. अशीच एक घटना समोर आली आहे जी वाचून तुमच्या अंगाला काटा येईल. उत्तर प्रदेशातील बरेलीमध्ये एका २१ वर्षीय विवाहित तरुणीची हुंडा कमी दिला म्हणून सासरच्यांनी जबरदस्ती अॅसिड तोंडात ओतून निघृण हत्या केली आहे. त्या वधूचे नाव यशोदा देवी आहे.
यशोदाचे बरेलीतील बहेडी परिसरात राहणाऱ्या ओमकारसोबत १७ फेब्रुवारी २०१९ रोजी लग्न झाले होते. तिच्या लग्नात माहेरच्यांनी तिला हुंडा दिला होता. परंतु, सासरच्यांनी हुंडा कमी आल्याने तिची मारहाण केली आणि तिला त्रास देण्यास सुरवात केली. तिला सांगितले की, माहेरहुन हुंडा घेऊन ये असे सांगितले. तिच्या भावाने बहिणीवर अत्याचार होत असल्यामुळे आणखी वीस हजार रुपये दिले. परंतु, तरीही ओमकारसह सासरच्या मंडळीची हाव कमी न होता वाढत गेली. नंतर त्यांनी पुन्हा यशोदाला त्रास द्यायला सुरुवात केली.
यशोदाने तिच्या वडिलांना फोन केला आणि घडत असलेली हकीकत सांगितली. तिचे सासरचे तिला मारहाण करून जबरदस्ती काहीतरी पाजत असल्याचे तिने वडिलांना सांगितले. त्यानंतर तिचे वडील व भाऊ तात्काळ बहेडी पोलीस ठाण्यात पोचले आणि ओमकारविरोधात त्यांनी तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलीस तिथे पोहोचले तेव्हा यशोदा गंभीर अवस्थेत पडलेली होती आणि तिची जीभ व ओढ भाजलेले होते. त्यानंतर पोलिसांनी तिला ताबडतोब रुग्णालयात दाखल केले. मात्र, तेथे डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. बहेडी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हा हुंडाबळीचा गुन्हा असून सासरची मंडळी फरार झालेली आहेत.