पुणे : बहुजननामा ऑनलाईन – बांधकाम व्यावसायिकाकडून ५० हजार रुपयांची लाच (Bribery Case) घेताना पकडलेल्या मुख्य विधी सल्लागार मंजूषा इधाटे (Manjusha Idhate) यांना एक दिवस पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस. बी. हेडाऊ (Judge S. B. Hedau) यांनी हा आदेश दिला.
इधाटे यांना त्यांच्या कार्यालयात पन्नास हजार रुपयांची लाच (Bribery Case) घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (Bribery Prevention Department) मंगळवारी ( दि. १४) रंगेहाथ पकडले. त्यानंतर त्यांच्या निवासस्थानी छापे टाकण्यात आले होते. इधाटे यांना मंगळवारी न्यायालयात (Court) हजर करण्यात आले होते. तांत्रिक विश्लेषणासह या गुन्ह्याशी संबंधित कागदपत्रांची पडताळणी, निरनिराळ्या व्यक्तींचे जबाब घ्यायचे आहेत. त्यासाठी पाच दिवस पोलीस कोठडी मिळावी, अशी मागणी सरकारी वकील ऍड. रमेश घोरपडे (Government Advocate Adv. Ramesh Ghorpade) यांनी केली. तपास अधिकारी पोलीस निरीक्षक ज्योती पाटील (Police Inspector Jyoti Patil) यांनी छाप्याबाबतची माहिती न्यायालयास दिली. छाप्याची पूर्ण कार्यवाही झाली असून आरोपी तपासाला सहकार्य करीत असल्याने पोलीस कोठडीची आवश्यकता नसल्याची बाजू आरोपीचे वकील प्रताप परदेशी यांनी मांडली.
कृपया हे देखील वाचा:
Pune Corona : दिलासादायक ! पुणे शहरात गेल्या 24 तासात 351 रुग्ण ‘कोरोना’मुक्त
Pune Traffic | सारसबाग येथील वाहन पार्किंगमध्ये बदल
चीन्यांना भारतीयांनी दिले सडेतोड उत्तर; 43 % लोकांनी खरेदी केल्या नाहीत चीनी वस्तू