बहुजननामा ऑनलाइन टीम – लाच स्वीकारल्या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या निवासी उपजिल्हाधिकारी स्वाती सूर्यवंशी यांना साडेचार लाख रुपयाच्या लाच प्रकरणात ( 25 सप्टेंबरपर्यंत ) न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली.
त्यानुसार तिन्ही आरोपींना रवानगी करण्यात आली असून त्यांना जिल्हा मध्यवर्ती कारागृहात दाखल करण्यात आले आहे.
दरम्यान ( 15 सप्टेंबर ) रोजी आरोपींनी जामिनासाठी कोर्टात अर्ज दाखल केला. त्यावर सुनावणी होणार असल्याचे कळते.
बुधवार ( 9 सप्टेंबर ) रोजी परभणी जिल्हा सत्र न्यायालयाने त्यांना दोन दिवसांच्या पोलिस कोठडीत घेतल्यानंतर या तिन्ही आरोपींना काल शुक्रवार ( 11 सप्टेंबर ) रोजी पुन्हा न्यायालयात हजर केले असता ( 25 सप्टेंबर ) पर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली.
लाचेची मागणी करणाऱ्या निवासी उपजिल्हाधिकारी स्वाती सूर्यवंशीसह तिन्ही आरोपी लाच लुचपत प्रतिबंधक खात्याच्या सापळ्यात अडकले होते.
गंगाखेड नगरपालिकेच्या विकासकामांच्या प्रशासकीय मान्यतेसाठी जिल्हा प्रशासनाच्या नगरपरिषद विभागाकडे हा प्रस्ताव मंजुरीसाठी सादर करण्यात आला. लाच प्रकरणी उपजिल्हाधिकारी स्वाती सूर्यवंशी, मुख्य लिपिक श्रीकांत कारभाजने, अभियंता अब्दुल हकीम अब्दुल खय्युम, हे तिन्ही आरोपी लाचलुचपत प्रतिबंधक पथकाच्या सापळ्यात अडकले होते.