मुंबईः बहुजननामा ऑनलाइन – युवा स्वाभिमान पक्षाच्या नेत्या आणि अमरावतीच्या अपक्ष खासदार नवनीत राणा (MP Navneet Rana) यांना मुंबई उच्च न्यायालयाने चांगलाच दणका दिला आहे. नवनीत राणा (MP Navneet Rana) यांनी सादर केलेले जात प्रमाणपत्र हे खोटे असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे हायकोर्टाने हे प्रमाणपत्र रद्द केले आहे. तसेच कोर्टाने त्यांना 2 लाखांचा दंड ठोठावला आहे. न्यायालयाच्या या निर्णयाने राणा यांना मोठा धक्का बसला असून खासदारकी धोक्यात आली आहे.
खासदार राणा यांचे जात वैधता प्रमाणत्र खोट असल्याबाबत शिवसेनेचे माजी खासदार आनंदराव अडसुळ यांनी मुंबई उच्च न्यायालयात दावा दाखल केला होता.
या प्रकरणाचा निकाल मंगळवारी (दि. 8) न्यायालयाने घोषित केला आहे न्यायालयाने हा घटनेवरील घोटाळा आहे, असे मत नोंदवून सदर जात प्रमाणपत्र रद्द करून राणां यांना 2 लाखाचा दंड ठोठावला आहे. तसेच सदरचं खोटं जात प्रमाणपत्र 6 आठवड्याच्या आत शासनाला जमा करण्याचे आदेश दिले आहेत. आनंदराव अडसुळ यांच्या वतीने ॲड.सी.एम्.कोरडे, ॲड.प्रमोद पाटील व ॲड.सचिन थोरात यांनी बाजू मांडली. जातप्रमाणपत्र रद्द झाल्यामुळे नवनीत राणा यांना मोठा धक्का मानला जात आहे.
कृपया हे देखील वाचा:
अँटी फंगल इंजेक्शनची काळया बाजारात विक्री
लाचखोरीच्या आरोपावरून पोलिस उपनिरीक्षकासह चौघे तडकाफडकी निलंबीत
बँकिंग क्षेत्रात करिअर करण्याची सुवर्णसंधी ! 10466 पदांसाठी भरती, जाणून घ्या प्रक्रिया
धक्कादायक ! सावत्र आईकडून अल्पवयीन मुलाचा छळ, रागाच्या भरात गुप्तांगाला दिले चटके
फायद्याची गोष्ट ! एकाच दिवसात बनाल ‘लखपती’, 14 ते 16 जूनपर्यंत बंपर कमाईची ‘सुवर्णसंधी’, जाणून घ्या