बहुजननामा ऑनलाईन टीम : बॉर्डर रोड्स ऑर्गनायझेशनने मल्टी स्किल वर्कर यांच्या रिक्त जागांसाठी अधिसूचना जारी केली आहे. बॉर्डर रोड ऑर्गनायझेशनने या रिक्त पदांसंदर्भातील संपूर्ण माहिती bro.gov.in या वेबसाईटवर दिली आहे. जेव्हा उमेदवार अर्ज करण्यास सुरुवात करतील त्यानंतर रिक्त स्थानाशी संबंधित तपशील अधिसूचना प्रसिद्ध केली जाईल. ही भरती अधिसूचना संरक्षण मंत्रालय, बोर्ड रोड विंग्सने जारी केली आहे. सामान्य राखीव अभियंता दलामध्ये ही पदे रिक्त आहेत. ही पदे केवळ पुरुष उमेदवारांसाठी आहेत. मल्टी स्किल कामगारांसाठी एकूण ५४० जागा रिक्त आहेत.
एकूण पोस्ट – ५४०
यूआर: २२१
एससी: ८१
एसटी: ४०
ओबीसी: १४५
ईडब्ल्यूएस: ५३
ज्या उमेदवारांना भरती प्रक्रियेत भाग घ्यायचा आहे त्यांनी बीआरओच्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन शेवटच्या तारखेपूर्वी दर्शविलेल्या स्वरुपात अर्ज करावा. अर्ज करण्याची शेवटची तारीख लवकरच वेबसाईटवर जाहीर केली जाईल. दरम्यान सध्या सीमा रस्ता संघटनेची अध्यक्ष्य संरक्षण राज्यमंत्रीद्वारे केली जाते. सीमा कनेक्टिव्हिटीला चालना देण्यासाठी सीमा रस्ता संघटना पूर्णपणे संरक्षण मंत्रालयाच्या अंतर्गत आणली गेली आहे.
Visit : bahujannama.com