नवी दिल्ली : वृत्तसंस्था – बर्याच वेळा मॅसेजेस पाठवितांना चूक होते, ज्याचा त्रास सहन करावा लागतो. अशाच प्रकारची घटना एका 20 वर्षीय चीनमधील मुलाबरोबर घडली असून त्याने मौजमजा करण्यासाठी एका कॉलगर्लला मॅसेज केला. मात्र तो मॅसेज चुकून त्याच्या गर्लफ्रेंडला गेला. त्यानंतर मात्र त्याच्यावर भलतेच संकट कोसळले. मिळालेल्या माहितीनुसार, चीनमधील हुबेई येथील राहणाऱ्या या तरुणाने आपल्या मित्रांबरोबर केलेल्या पार्टीनंतर एका कॉलगर्लला मॅसेज करत तिला संपूर्ण रात्रीसाठी बुक केले. त्यावेळी त्याने तिच्या खात्यावर ४००० रुपये देखील पाठवले. त्याचबरोबर हॉटेलचे नाव आणि रूम नंबर देखील मॅसेज केला.
काही वेळानंतर वाजली डोअरबेल
अर्ध्या तासानंतर त्याच्या रूमची बेल वाजली. त्यानंतर त्याने दरवाजा उघडला असता त्याला धक्काच बसला. दरवाजामध्ये त्याची गर्लफ्रेंड उभी होती. त्यावेळी त्याची चूक त्याच्या लक्षात आली. त्याने चुकून आपल्या गर्लफ्रेंडला मॅसेज करून पैसे देखील तिच्याच खात्यात पाठवले होते.
गर्लफ्रेंडने केला आरडाओरडा
त्यावेळी त्याने तिची समजूत काढण्याचा प्रयत्न केला, मात्र तिने त्याचे काहीही न ऐकता आरडाओरडा सुरु केला. त्यांच्या दोघांच्या आवाजाने इतर आजूबाजूचे देखील गोळा झाले. त्यांच्या या भांडणाला हॉटेल कर्मचाऱ्यांना देखील सांभांळणे अवघड झाले.
पोलिसांना दिली माहिती
भांडण वाढू लागल्यानंतर हॉटेल कर्मचाऱ्यांनी याची माहिती पोलिसांना दिली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत दोघांची समजूत घालण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर दोघांनाही समजावत पोलिसांनी शांत केले.
Visit : bahujannama.com