Bombay High Court | डीएसके यांचे जावई केदार वांजपे यांना मुंबई उच्च न्यायालयाकडून दिलासा

फुरसुंगी (Fursungi) येथील शेतकऱ्यांकडून त्यांची जमीन कमी भावात विकत घेऊन ती जमीन डीएसके यांच्या कंपनीला जास्त भावात विकून त्यात नफा कमविण्याच्या आरोपावरून केदार वांजपे यांच्याविरुद्ध दोषारोप पत्र (Charge sheet) ठेवण्यात आले होते. केदार वांजपे यांच्या वतीने अॅड.अनिकेत निकम (Adv. Aniket Nikam) यांनी उच्च न्यायालयात (Bombay High Court) युक्तिवाद केला की, केदार वांजपे यांच्याविरुद्ध ठेवण्यात आलेले आरोप हे बिनबुडाचे आहेत आणि फुरसुंगी जागेचे सर्व व्यवहार हे सहआरोपी बघत होते. त्या जागेच्या खरेदी विक्री संदर्भातील कुठल्याही धनादेशावर केदार वांजपे यांनी सही केलेली नाही. तसेच केदार वांजपे यांचे बँक खाते (Bank Account) हे डीएसके यांचे इतर नातेवाईक हाताळत होते आणि केदार वांजपे ह्या सदर व्यवहारामध्ये लाभार्थी नव्हते. त्यांच्या विरुद्ध केलेल्या आरोपांच्या संदर्भात तपास यंत्रणेकडे (investigating agency) पुरेसा पुरावा नाही असा युक्तिवाद कोर्टापुढे अॅड. निकम यांनी केला.केदार वांजपे यांना एक लहान मुलगा असून ते दोन वर्षापासून तुरुंगात आहेत म्हणून त्यांचा जामीन अर्ज मंजुर करण्यात यावा अशी कोर्टास विनंती केली.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
यात विशेष सरकारी वकील चव्हाण (Special Public Prosecutor Chavan) यांनी केदार वांजपे यांनाजामीन देऊ नये व सकृतदर्शनी त्यांच्या विरोधात गुन्हा सिद्ध होतो अशा स्वरूपाचा युक्तिवाद करत जामीन देण्यास हरकत घेतली. उच्च न्यायालयाने दोन्ही पक्षांची बाजू ऐकल्यानंतर केदार वांजपे यांचा जामिनाचा अर्ज मंजूर केला व त्यामध्ये निरीक्षण नोंदविले की तपसाअंती केदार वांजपे ह्यांच्याकडे जागेच्या व्यवहारातील पैसे आल्याचे दिसून येत नाही. केदार वांजपे हे या प्रकरणातील डीएसके घोटाळ्याच्या प्रकरणातील (DSK Scam Case) सहआरोपी आहेत व उच्च न्यायालयाने दिलासा दिल्यामुळे लवकरच ते तुरुंगाच्या बाहेर येतील.
Web Title :- Bombay High Court | Mumbai High Court grants relief to DSK’s son in law Kedar Wanjpe
Comments are closed.