बहुजननामा ऑनलाइन टीम -नवी दिल्ली : वृत्तसंस्था – पाकिस्तानमधील कराची ( Karachi) मध्ये मोठा स्फोट(bomb blast) झाला आहे. गुलशन-ए-इकबाल ( Gulshan-e-Iqbal) मध्ये मसकन चौरंगी येथील दुमजली इमारतीत हा स्फोट ( bomb blast) झाला आहे. त्यामध्ये अनेक लोक जखमी झाले आहेत.
4-5 people have reportedly been injured after an explosion at a 4-storey building opposite the Karachi University Maskan gate in Gulshan-e-Iqbal. The police are determining the nature of the blast: Pak Media
— ANI (@ANI) October 21, 2020
हा स्फोट एवढा भयंकर होता कि आजूबाजूच्या इमारतींच्या खिडक्यांच्या काचा फुटल्या.पाकिस्तानी मीडिया डॉनने दिलेल्या माहितीनुसार या स्फोटात ३ जणांचा मृत्यू झाला आहे, तर १५ हून अधिक लोक जखमी झाले आहेत.अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार सर्व जखमी आणि मृतांना पटेल रुग्णालयात ( Patel Hospital) नेण्यात आलं आहे.
अद्याप स्फोटाचे कारण समजू शकलेले नाही. मुलिना टाऊन पोलिसांच्या एसएचओने सांगितले की प्रथमदर्शनी हा सिलेंडरचा स्फोट असल्याचे समजत आहे. या स्फोटाचे कारण शोधण्यासाठी बॉम्बस्फोटाचे पथक रवाना झाले आहे.