मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – नारकोटिक्स कंट्रोल ब्यूरो (एनसीबी) च्या टीमने आपला फास आवळण्यास सुरूवात करत अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणात ड्रग्स कनेक्शनवरून रिया चक्रवर्तीचा भाऊ शौविक चक्रवर्ती आणि सॅम्युअल मिरांडा या दोघांना अटक केली आहे. एनसीबीच्या टीमने रिया आणि सुशांतचा मॅनेजर सॅम्युअल मिरांडाच्या घरावर छापा मारला होता. यानंतर शौविक आणि मिरांडाला आपल्या कार्यालयात चौकशीसाठी नेले होते.
एनसीबीचे उप संचालक के. पी. एस. मल्होत्रा यांनी मीडियाला सांगितले की, शौविकच्या घराची आणि मिरांडाच्या घराची झडती घेतली जात आहे, परंतु त्यांनी सविस्तर सांगण्यास नकार दिला. सकाळी 6.30 वाजताच्या सुमारास छापा मारण्यात आला. हा छापा एक कथित ड्रग्ज व्यवसायिक जैद विलात्राला मुंबई न्यायालयाने सात दिवसासाठी एनसीबीच्या कस्टडीत पाठवल्यानंतर मारण्यात आला आहे.
’नारकोटिक ड्रग्स अँड सायकोट्रॉपिक सब्सटन्स अॅक्ट’ 1985 च्या तुरतुदी आंतर्गत हा छापा मारण्यात आला. मुंबईच्या जुहू तारा रोडवर प्रिमरोज हौसिंग सोसायटीच्या बाहेर मोठ्या संख्येने पोलीस तैनात आहेत, ज्यामध्ये चक्रवर्ती कुटुंबाने भाडेतत्वावर घेतलेला फ्लॅट आहे. एनसीबीला ईडीने पत्र लिहून कारवाई करण्याची विनंती केल्यानंतर 26 ऑगस्टला प्रकरण नोंदवण्यात आले होते.
प्रकरण नोंद झाल्यानंतर 27-28 ऑगस्टच्या मध्यरात्री एनसीबीने मुंबईत तपास करून अब्बास लखानी आणि करण अरोडा यांना अटक केली आणि त्यांच्याकडून ’बड’ (क्यूरेटेड मारिजुआना) जप्त केले. प्रकरणात सहभागी व्यक्तींच्या तथाकथित सोशल मीडिया चॅटमध्ये काही ठिकाणी ’बड’ चा उल्लेख आहे.
अधिकार्याने म्हटले की, नेटवर्कबाबत सविस्तर माहिती घेणे आणि तपासात विलात्राचा साथीदार लखानीचे संबंध समोर आले. विलात्राने हा सुद्धा खुलासा केला की, तो ड्रग पॅडलिंगच्या धंद्यात, खासकरून बड, द्वारे चांगली कमाई करत होता.
अधिकार्याने म्हटले, विलात्राच्या चौकशीच्या आधारे, अब्दुल बासित परिहारला तपासाच्या कक्षेत आणण्यात आले. हे समजले होते की, ईडीद्वारे सादर करण्यात आलेल्या माहितीच्या आधारे प्राथमिक तपासात अगोदरच्या आरोपी व्यक्तींसोबत परिहारचे संबंध आढळून आले होते.
एनसीबी सूत्रांनी सांगितले की, परिहारचा संबंध सॅम्युअल मिरांडाशी होता, जो रिया चक्रवर्तीचा जवळचा सहकारी सुद्धा होता. मिरांडावर रियाचा भाऊ शौविकच्या निर्देशावर ड्रग्ज खेरदी करण्याचा आरोप आहे.
एनसीबीने रिया, तिचा भाऊ शोविक, टॅलेंट मॅनेजर जया साहा, सुशांतची को-मॅनेजर श्रुती मोदी आणि गोव्याचा हॉटेल व्यवसायिक गौरव आर्यच्या विरूद्ध ’नारकोटिक ड्रग्ज अँड सायकोट्रॉपिक सब्सटन्स अॅक्ट’ चे कलम 20 (बी) 28, 29 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
रिया आणि श्रुती मोदी, मिरांडा आणि सिद्धार्थ पिठानी यांच्यामध्ये व्हॉट्सअॅपवर झालेल्या चर्चा समोर आल्यानंतर अंमलबजावणी संचालनालय (ईडी) द्वारे मंगळवारी एनसीबीला लिहिल्यानंतर एनसीबीने गुन्हा दाखल केला होता.