बहुजननामा ऑनलाईन टीम – जगभरात कोरोनाने धुमाकूळ घातला असून अनेकांना त्याची बाधा झाली आहे. बॉलिवूड गायिका कनिका कपूरचा कोरोना अहवाल निगेटिव्ह आल्यानंतर तिला डिस्चार्ज देण्यात आला आहे, दुसरीकडे बॉलिवूड निर्माता करीम मोरानीच्या दोन्ही मुलींची कोरोना चाचणी करण्यात आली होती. याआधी शजा मोरानी कोरोना पॉझिटिव्ह आढळली होती. त्यांनतर आता त्याची दुसरी मुलगी अभिनेत्री झोया मोरानीलाही कोरोनाची लागण झाल्याचे निष्पण्ण झाले आहे.
प्रसिद्ध चित्रपट निर्माता आणि शाहरुख खानचा निकटवर्ती करीम मोरानीच्या दुसर्या मुलीलाही कोरोनाची लागण झाल्यामुळे चित्रपट सृष्टीमध्ये खळबळ उडाली आहे. मोरानीची दुसरी मुलगी आणि अभिनेत्री झोयाला मुंबईच्या कोकिलाबेन रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तिचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला असून आयसोलेशन आयसीयूमध्ये ठेवण्यात आले आहे. तर शजा मोरानी नानावटी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. शजा मार्चच्या सुरुवातीला श्रीलंकेहून परतली होती. तर झोया मार्च महिन्यात राजस्थानहून परतली होती. माझ्या दोन्ही मुलींनी या संदर्भात अधिकार्यांना संपूर्ण माहिती दिली होती, असे करीम मोरानी यांनी सांगितले. विशेष म्हणजे करीमच्या दोन्ही मुलींची कोरोना चाचणी करण्यात आली होती. परंतु जोयाचा अहवाल निगेटिव्ह आला. तर शजा कोरोना पॉझिटिव्ह आला. शजामध्ये आठवडाभर कोरोनाची कोणतीही लक्षणे दिसली नाहीत, ती पूर्णत: बरी होती. पण मोठी मुलगी झोयामध्ये कोरोनाची लक्षणे आढळून आली होती, तरीही तिचा अहवाल निगेटिव्ह आला. तिची पुन्हा तपासणी केली. सध्या दोघीही आयसोलेशन आणि डॉक्टरांच्या देखरेखीखाली आहेत. दरम्यान, मोरानीचे कुटुंब राहणारी इमारत सील करण्यात आली आहे. त्यामुळे जवळपासच्या परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.