बहुजननामा ऑनलाईन – देशभरात कोरोना विषाणूच्या प्रकरणांत पुन्हा एकदा झपाट्याने वाढ होत आहे. गेल्या 24 तासांत एक लाखाहून अधिक प्रकरणे नोंदवली गेली आहेत. महाराष्ट्र, पंजाब आणि गुजरातसह अनेक राज्यात या साथीच्या नवीन घटनांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. महाराष्ट्रातील कोरोनाचा वेग नियंत्रणात नसताना राज्य सरकारने ‘वीकेेंड लॉकडाउन’ जाहीर केले आहे आणि त्याबरोबर कडक निर्बंध लादले आहेत.
त्याचवेळी महाराष्ट्रातील लॉकडाऊनमुळे अभिनेत्री सनी लिओनीला मजबूरीने शुटिंगमधून घरी परत जावे लागले आहे. ही माहिती अभिनेत्रीने स्वत: दिली आहे. याबाबत तिने स्वत: चा एक फोटोसोशल मीडियावर शेअर करुन माहिती दिली. सनी लिओनी सोशल मीडियावर खूप अॅक्टिव आहे. ती तिच्या चाहत्यांसाठी खास फोटो आणि व्हिडिओ शेअर करत राहते. सनी लिओनीने तिच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर स्वतः चा एक फोटो शेअर केले आहे.
या फोटोत ती कॅज्युअल ड्रेसमध्ये दिसत आहे. कूल शेड्स, मास्क आणि हँडबॅग्ज तिचा लुक पूर्ण करतात. हा फोटो शेअर करताना सनी लिओनीने कॅप्शनमध्ये लिहिले की, लॉकडाऊनमुळे मजबूरीने शूूटिंगमधून घरी परत यावे लागले. प्रत्येकाने सुरक्षित रहावे.” सनी लिओनीचा हा फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. अभिनेत्रीचे बरेच चाहते आणि सर्व सोशल मीडिया वापरकर्त्यांना तिचा हा फोटो खूपच आवडला असून कमेेंट्स करून प्रतिक्रिया देत आहे.
त्याच वेळी, कोरोना विषाणूची तपासणी करण्याच्या निर्णयाबाबत महाराष्ट्र सरकारने हा अनियंत्रित साथीवर मात करण्यासाठी विकेंड लॉकडाऊन जाहीर केले आहे. यावेळी, इतर दिवस 50 टक्के क्षमतेसह सरकारी कार्यालयांमध्ये काम केले जाईल, खाजगी कार्यालयांमध्ये वक्र फ्रॉम करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. चित्रपट आणि मालिकांचे शूटिंग सुरूच राहिल, परंतु गर्दी असलेले सीन टाळण्यासाठी सूचना देण्यात आल्या आहेत. त्याच वेळी, केवळ 20 लोक अंत्यसंस्कारात आणि 50 लोक विवाह सोहळ्यात सहभागी होऊ शकतील. शाळा, महाविद्यालयेही बंद असतील, भाजीपाला बाजारपेठा खुल्या असतील.