मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – गानकोकिळा या नावाने प्रसिद्ध गायिका लता मंगेशकर यांना प्रकृती अस्वास्थ्याच्या कारणामुळे सोमवारी मुंबईच्या ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांना फुफ्फुसातील गंभीर आजाराने ग्रासले आहे. टाईम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार, ९० वर्षीय लता मंगेशकर यांची प्रकृती अद्याप गंभीर आहे आणि त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, श्वास घेण्यास त्रास होऊ लागल्यानंतर त्यांना रात्री दीड वाजता रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यानंतर आता त्यांना आयसीयूमध्ये व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले आहे.
इंटरनल मेडिसिन फिजिशन, डॉक्टर प्रतित समदानी यांनी आपल्या अहवालात सांगितले आहे कि, लता मंगेशकर यांना निमोनिया झाला असून त्यांचा डावा वेंट्रिकुलर देखील खराब झाला आहे. डॉक्टरांच्या मते डाव्या वेंट्रिक्युलरमुळे हृदयाला जास्तीत जास्त ऑक्सिजन मिळतो आणि शरीराच्या सामान्य कार्यासाठी हे फार महत्वाचे आहे. अशा परिस्थितीत, हृदयाच्या डाव्या भागाला रक्त पुरवण्यासाठी अधिक काम करावे लागेल. सध्या त्यांची प्रकृती चिंताजनक असून मागील काही तासांमध्ये यामध्ये सुधारणा पाहायला मिळाली. त्याचबरोबर सुरक्षेच्या कारणास्तव रुग्णालय आणखी माहिती देत नसून त्यांच्या कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांची प्रकृती सध्या स्थिर आहे.
लता मंगेशकर या भारतातील सर्वात प्रसिद्ध गायिका असून त्यांनी आतापर्यंत ३६ भाषांमध्ये गाणे गायले आहे. त्यांनी हिंदीमध्ये १००० हून अधिक गाण्यांसाठी आपला आवाज दिला आहे. त्यांचा जन्म २८ सप्टेंबर १९२९ रोजी झाला होता. २००१ मध्ये त्यांना देशाचा सर्वोच्च नागरी सन्मान भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यापूर्वी त्यांना दादासाहेब फाळके पुरस्कारानेही गौरविण्यात आले आहे.
Visit : bahujannama.com