बहुजननामा ऑनलाइन टीम – बॉलिवूड स्टार वरुण धवन (Varun Dhawan) आणि सारा अली खान (Sara Ali Khan) सध्या त्यांचा आगामी सिनेमा कुली नंबर 1 (Coolie No. 1) मुळं चर्चेत आहेत. हा सिनेमा अॅमेझॉन प्राईम (Amazon Prime) वर ख्रिसमस डेला म्हणजेच 25 डिसेंबर रोजी रिलीज होणार आहे. शनिवारी (दि. 28 नोव्हेंबर) सिनेमाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. गुरुवारी (3 डिसेंबर रोजी) या सिनेमातील पहिलं गाणं तेरी भाभी (Teri Bhabhi – Coolie No.1, Varun Dhawan, Sara Ali Khan) रिलीज झालं होतं. गाण्याला चाहत्यांचा चांगला प्रतिसाद मिळाला होता. यानंतर आता सिनेमातील आणखी एक गाणं हुस्न है सुहाना (Husnn Hai Suhaana New – Coolie No.1) रिलीज झालं आहे. गोविंदा आणि करिश्मा यांचंच गाणं रिक्रिएट करण्यात आलं आहे.
या गाण्यात वरुण आणि सारा यांचा जबरदस्त डान्स दिसत आहे. गाण्यातील दोघांची केमिस्ट्रीही चाहत्यांना खूप आवडली आहे. सध्या या गाण्याची सोशल मीडियावर जोरदार चर्चा होत आहे.
कुली नंबर 1 सिनेमाबद्दल बोलायचं झालं तर बॉलिवूड स्टार करिश्मा कपूर (Karisma Kapoor) आणि गोविंदा (Govinda) यांच्या 1995 साली आलेल्या कुली नंबर 1 या सिनेमाचा हा रिमेक आहे. डेविड धवननं या सिनेमाचं डायरेक्शन केलं आहे. रिमेकमध्ये सारा आणि वरुण सोबतच परेश रावल, जावेद जाफरी, जॉनी लिवर, राजपाल यादवसहित इतर कलाकार दिसणार आहेत. वासू भगनानी आणि दीपशिखा देशमुख यांनी याची निर्मिती केली आहे.
गाण्याबद्दल बोलायचं झालं तर चंदना दीक्षित आणि अभिजित भट्टाचार्य यांनी हे गाणं गायलं आहे. तनिष्क बागची आणि आनंद मिलिंद यांनी गाण्याला म्युझिक दिलं आहे. समीर अंजान यानं हे गाणं लिहिलं आहे. सध्या गाणं सोशलवर व्हायरल होताना दिसत आहे.
कुली नंबर 1 सिनेमाबद्दल बोलायचं झालं तर बॉलिवूड स्टार करिश्मा कपूर (Karisma Kapoor) आणि गोविंदा (Govinda) यांच्या 1995 साली आलेल्या कुली नंबर 1 या सिनेमाचा हा रिमेक आहे. डेविड धवननं या सिनेमाचं डायरेक्शन केलं आहे. रिमेकमध्ये सारा आणि वरुण सोबतच परेश रावल, जावेद जाफरी, जॉनी लिवर, राजपाल यादवसहित इतर कलाकार दिसणार आहेत. वासू भगनानी, जॅकी भगनानी आणि दीपशिखा देशमुख यांनी याची निर्मिती केली आहे.