नवी दिल्ली : वृत्तसंस्था – अभिनेता नसीरुद्दीन शाह, मीरा नायर, रत्ना पाठक शाह, जावेद जाफरी, गायक टीएम कृष्णा, लेखक अमिताभ घोष, इतिहासकार रोमिला थापर यांच्यासारख्या 300 प्रसिद्ध व्यक्तींनी इंडियन कल्चरल फोरमच्या मंचावरून एका खुल्या पत्राद्वारे सीएए-एनआरसीविरोधात आंदोलन करणार्या विद्यार्थ्यांचे समर्थन केले आहे. या पत्रांवर 300 जणांच्या सह्या आहेत. या सर्वांनी नागरिकत्व दुरूस्ती कायदा (सीएए) आणि नॅशनल रजिस्टर ऑफ सिटीजन (एनआरसी) च्या विरूद्ध आंदोलन करणार्या विद्यार्थ्यांसोबत उभे राहणार असल्याचे म्हटले आहे.
या खुल्या पत्रात लिहिले आहे की, सर्व सह्या करणारे नागरिकत्व दुरूस्ती कायदा (सीएए) आणि राष्ट्रीय रजिस्टर ऑफ सिटीजन्स (एनआरसी) च्या विरोधात आंदोलन करत असलेले विद्यार्थी आणि अन्य लोकांच्या सोबत उभे आहोत. आणि भारताच्या संविधानाची तत्व आबधित ठेवण्यासाठी त्यांच्याकडून सुरू असलेल्या विरोधात आम्ही त्यांच्या सोबत आहोत. या खुल्या पत्रात हेदेखील म्हटले आहे की, जे लोक लोकशाही सोबत उभे आहेत, आम्ही त्यांच्या सोबत उभे राहू. या खुल्या पत्रात जामिया मिलिया इस्लामिया आणि अलीगड मुस्लिम विश्वविद्यालयातील विद्यार्थ्यांवर करण्यात आलेल्या कारवाईचाही निषेध करण्यात आला आहे.
भारतात जगातील कोणत्याही लोकाशाही देशांच्या तुलनेत सर्वात जास्त वेळा इंटरनेट बंद करण्याचे प्रकार घडले आहेत. पोलिसांनी केलेल्या हिंसेत शेकडो लोक जखमी झाले आहेत, ज्यामध्ये जामिया मिल्लिया इस्लामिया विश्वविद्यालय आणि अलीगड मुस्लिम विश्वविद्यालयाच्या विद्यार्थ्यांचाही समावेश आहे. हा विरोध रोखण्यासाठी अनेक राज्यात कलम 144 लागू करण्यात आले आहे.यापूर्वी अभिनेता नसीरुद्दीन शाह यांनी अभिनेता अनुपम खेर यांना विदूषक बोलून त्यांची वक्तव्य गांभिर्याने घेऊ नका असे म्हटले होते. यानंतर अनुपम खेर यांनी ट्विरवर उत्तर देताना एक व्हिडिओ पोस्ट करून नसीरुद्दीन शाह यांना फ्रस्ट्रेटेड म्हटले होते.
Visit : bahujannama.com