बहुजननामा ऑनलाईन टीम – देशात कोरोनाचा हाहाकार वाढत चालला असून नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण गडद झाले आहे. राजकारणी ते बॉलीवूड अभिनेते यांनाही कोरोनाची लागण झाल्याचे दिसून आले आहे. अशातच लंडनमध्ये गेल्या दोन आठवड्यांपासून कुटुंबासमवेत राहणार्या बॉलिवूड अभिनेता पूरब कोहलीने संपूर्ण कुटुंब कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे सांगितले आहे. त्याने यासंदर्भात इंस्टाग्रामवर जनरल फिजिशियनने त्याच्यासह कुटूंबाला कोरोना विषाणूची लागण झाल्याचे सांगितले आहे.
इन्स्टाग्राम पोस्टमध्ये सांगितले की, सुरुवातील त्याच्या कुटुंबात सामान्य लक्षणे दिसत होती. परंतु डॉक्टरकडे तपासणी केल्यानंतर त्यांना कोरोनाची लागण झाली आहे असे सांगण्यात आले. आता दोन आठवड्यांनंतरही त्याचे कुटुंब आता बरे होत आहेत. काही दिवसांपुर्वी तब्येत खराब झाली होती मात्र आता सर्वजण बरे आहेत. आता सुमारे दोन आठवड्यांनंतर पूरबने मित्रांनो, आम्हाला फ्लू झाला होता असे वाटत होते. जेव्हा आम्ही ही लक्षणे जनरल फिजिशियनला दाखवली तेव्हा त्यांनी आम्हाला कोरोनाचा संसर्ग झाल्याचे सांगितले. सुरुवातील अगदी सामान्य फ्लूसारखे वाटत होते. परंतु त्यात खूप जास्त खोकला झाला होता आणि श्वास घ्यायलाही त्रास होत होता.
’पहिल्यांदा मुलगी इनायाची प्रकृती खालावली होती. दोन दिवस तिला थंडीचा त्रास होत होता. त्यानंतर, पत्नी लकी पायटेनच्या छातीत त्रास जाणवू लागला. पूरबलादेखील कफचा त्रास होत होता. प्रत्येकजण कोरोनाबाबत कफच्या लक्षणांबद्दल बोलत होते. त्यादरम्यान, मला खूप सर्दी झाली. एके दिवशी तर मला खूप त्रास झाला. जवळजवळ तीन दिवस मला या कफमुळे चिडचिड होत होती. या काळात ताप जास्त नव्हता. आमच्या तिघांच्याही शरीराचे तापमान 100 ते 101 फॅरनहाइटपर्यंत होते.’ ’आम्ही दिवसात चार वेळा मीठाच्या पाण्याने गुळण्या करतो. आलं, हळद आणि मधाचे मिश्रण आणि शिवाय गरम पाण्याची बाटली छातीवर ठेवल्यामुळे छातीतील दुखणे कमी होते. याशिवाय ध्यान धारणा मानसिक आरोग्य चांगले ठेवते.