मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – बॉलीवुडचे प्रसिद्ध अभिनेते धर्मेंद्र यांचा पुत्र बॉबी देओल सर्वांनाच माहित आहे. वडील आणि भावाप्रमाणे त्यांचे करियर फार यशस्वी होऊ शकले नाही. एका काळात वेगाने समोर आलेला बॉबी देओल करियरमध्ये अचानक अस्थिर झाला. अशा काळात त्याला साथ दिली ती पत्नी तान्या देओलने. उत्पन्नाबाबत बोलायचे तर त्याबाबतीत तान्या पतीपेक्षा एक पाऊल पुढे आहे. सौंदर्याच्या बाबतीतही तान्या उजवी आहे.
बॉबीने फोटो शेअर करून पत्नी तान्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. यानिमित्ताने तान्या देओलची जीवनशैली कशी आहे ते जाणून घेवूयात. तान्या फिल्मी जगतापासून दूर रहात असली तरी ती एक यशस्वी बिजनेस वुमन आहे. हो, तान्याचा स्वत:चा फर्निचर आणि होम डेकोरेटर्सचा व्यवसाय आहे. तिच्या शोरूमचे नाव द गुड अर्थ आहे. बॉलीवुडचे प्रसिद्ध कलाकार तान्याचे ग्राहक आहेत. ट्विंकल खन्नाच्या स्टोअरमध्ये सुद्धा तान्याने डिझाईन केलेल्या एक्सेसरीज लावण्यात आल्या आहेत. तान्या ही एका मोठ्या उद्योगपतीची मुलगी आहे. तान्याचे वडील देवेंद्र अहूजा 20th Century Finance Limite चे मॅनेजिंग डायरेक्टर होते.
बॉबी-तान्या यांनी 1996 मध्ये विवाह केला आणि आता त्यांना दोन मुलं आहेत. त्यांची नावे आर्यमन आणि धर्म आहेत. दोघांची लव्हस्टोरी मोठी मनोरंजक आहे. बॉबी आपल्या काही मित्रांसोबत रेस्टॉरन्टमध्ये चहा पिण्यासाठी गेला होता. त्याच रेस्टॉरन्टमध्ये तान्यासुद्धा आली होती. बॉबी तान्याला पाहताच तिच्या प्रेमात पडला. यानंतर बॉबीने तान्याची सर्व माहिती काढली आणि तिला फोन केला. त्यानंतर दोघे भेटले. जेव्हा बॉबी पहिल्यांदा तान्याला डेटवर घेऊन गेला तेव्हा त्याच रेस्टॉरन्टमध्ये घेऊन गेला, जेथे त्याने तान्याला पहिल्यांदा पाहिले होते. यानंतर दोघांच्या कुटुंबियांची भेट झाली. बॉबीचे वडील धर्मेंद्र यांना तान्या खुप पसंत पडली आणि दोघांचा विवाह लावून देण्यात आला. दोघांनी अतिशय चांगल्याप्रकारे आपले नाते सांभाळले आहे. बॉबीचा मोठा भाऊ म्हणजेच सनी देओलची पत्नीसुद्धा कॅमेर्यापासून दूर राहते. परंतु, ती व्यवसायाने रायटर आहे. मुलगा करणच्या डेब्यूदरम्यान ती दिसली होती.
Visit : bahujannama.com