नवी दिल्ली : वृत्तसंस्था – शरीरातील ब्लड शुगर लेव्हल नियंत्रित (Blood Sugar Control) ठेवण्यासाठी विशेष काळजी घ्यावी लागते. तसेच, काही पदार्थ आहेत जे ब्लड शुगर लेव्हल (Blood Sugar Level) वाढवू शकतात. अशा स्थितीत ब्लड शुगर लेव्हल वाढण्यासोबतच डायबिटिजचा धोकाही वाढतो. आज अशा फळांबद्दल आपण जाणून घेणार आहोत, ज्यांचे सेवन केल्याने ब्लड शुगर लेव्हल नियंत्रित (Blood Sugar Control) राहण्यास मदत होते.
ब्लड शुगर कंट्रोल करण्यासाठी फळे (Fruits To Control Blood Sugar)
1. बेरी (Berries) –
सकाळच्या नाश्त्यात बेरीचा सर्वाधिक वापर केला जातो. याशिवाय रात्री झोपताना खाण्यासाठीही याचा वापर करू शकता. शरीरातील रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी बेरी प्रभावीपणे उपयुक्त ठरू शकतात.
2. सफरचंद (Apple) –
असे म्हटले जाते की रोज एक सफरचंद खाल्ल्यास ते शरीराला अनेक आजारांपासून दूर ठेवण्यास मदत करते. त्याच वेळी, सकाळी एक सफरचंद खाल्ल्यास रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यास मदत होते. त्यामुळे रोज एक सफरचंद खाणे आवश्यक आहे.
3. संत्रे (Orange) –
लिंबूवर्गीय फळांच्या सेवनामुळे त्वचा देखील चमकदार राहते. याशिवाय यामध्ये असलेले पौष्टिक घटक शरीराला आजारांपासून दूर ठेवण्यास मदत करतात. दुसरीकडे, संत्र्याचे सेवन केल्याने ब्लड शुगर लेव्हल नियंत्रित राहण्यास मदत होते.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
4. टरबूज (Watermelon) –
प्रत्येक ऋतूत सहज उपलब्ध होणारे हे फळ आरोग्याच्या दृष्टीनेही अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. त्याच वेळी, बरेच लोक त्याचे नियमित सेवन देखील करतात, ज्यामुळे शरीराला डिहायड्रेशनच्या धोक्यापासून देखील वाचवता येते. याशिवाय शुगर लेव्हल नियंत्रित ठेवण्यासाठी टरबूजचा खूप फायदा होऊ शकतो.
Web Title :- blood sugar remains under control by consuming these fruits and fruits to control blood sugar
Pune Crime | पुण्यातील दुर्दैवी घटना ! 2 वर्षाच्या चिमुकल्याला टँकरने चिरडले