बहुजननामा ऑनलाईन – गुजरात मध्ये एक ढोंगी बाबाचा पर्दाफाश करण्यात पोलिसांना यश आले आहे. गुजरात मध्ये ढबुडी बाबा नावाने प्रसिद्ध असलेल्या एका ढोंगी बाबाचा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. बाबाच नाव धीरज ओड असे आहे. त्याची पोलखोल झाली तेव्हापासून धीरज फरार आहे. धीरज आपल्यासोबत एक विशेष बाहुली ठेवायचा आणि स्वतःचे तोंड एखाद्या ओढणीने झाकून घेऊन लोकांच्या समस्या सोडवायचा.
अंधविश्वास पसरवणारा हा बाबा धर्माच्या नावावर हा खेळ खेळत होता. विशेष म्हणजे अनेक मोठे मंत्री आमदार पोलीस कर्मचारी बाबांचे भक्त होते. जेव्हा आपली इच्छा पूर्ण होते तेव्हा अनेक लोकांनी बाबाला श्रीफळ, अगरबत्ती, ओढणी आणि पैसे देत असत. त्यामुळे ढोंगी बाबा कडे करोडो रुपयांची संपत्ती जमा झाल्याचे समोर आले आहे.
विशेष म्हणजे या बाबाचे कर्मचारी इच्छा पूर्ण झालेल्या भक्तांचा व्हिडिओ काढून सोशल मीडियावर वायरल करत असे. ज्यामुळे गर्दी जमायला मोठ्या प्रमाणात मदत होत होती. परंतु हा बाबा खोटी बाहुली खेळण्यातील बाहुली आपल्यासोबत ठेवत होता. हे जेव्हा पोलिसांच्या लक्षात आले तेव्हा पोलिसांनी या ढोंगी बाबाचा फर्दाफ़ाश केला आहे. गुजरातमध्ये बाहुलीला ढबुडी असे म्हणतात. त्यामुळे या बाबाला सगळेजण ढबुडी बाबा असे म्हणून ओळखत होते. बाबांच्या सोशल मीडियावर खूप मोठ्या प्रमाणात फॅन फॉलोअर्स पाहायला मिळाला आहे.