काबुल : वृत्तसंस्था – अफगणिस्तानचे राष्ट्रपती अशरफ गनी यांच्या रॅलीत आत्मघाती हल्ला झाला आहे. या हल्ल्यात 24 लोकांचा मृत्यू झाला आहे. या घटनेत 30 हून अधिक लोक जखमी झाले आहेत. टोलो न्यूजने दिलेल्या वृत्तानुसार, अद्याप कोणत्याही संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी घेतली नाही. एका सरकारी प्रवक्त्याच्या मते हा एक IED ब्लास्ट होता.
गेल्या काही दिवसांपूर्वी अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी अफगणिस्तान आणि तालिबानच्या नेत्यांसोबत सुरु असलेली शांततेची चर्चा रद्द करण्याची घोषणा केली होती. त्यामुळे परिसरातील तणाव खूपच वाढला आहे. सामान्य लोक सुरक्षिततेवर विधानं करताना दिसत आहेत.
BREAKING: blast close to Massoud Square and US Embassy in Macroryan 2 area in city of #Kabul. #Afghanistan pic.twitter.com/rCVeUpC5FH
— TOLOnews (@TOLOnews) September 17, 2019
या हल्ल्यामुळे सर्वत्र भीतीचे वातावरण पसरले आहे. जिथे राष्ट्रपतींवर हल्ला होतो तिथे सामान्य माणूस किती सुरक्षित आहे असा सवाल उपस्थित केला जाताना दिसत आहे. या स्फोटात 24 लोकांचा मृत्यू झाल्याने त्यांच्या कुटुंबावर शोककळा पसरली आहे. परिसरातील लोक या हल्ल्यामुळे भेदरले आहेत. हल्ल्यात जखमी झालेल्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.