नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारतात कोरोना व्हायरसच्या महामारीचा प्रकोप सुरू असतानाच ’ब्लॅक फंगस’चा धोका सुद्धा वाढत आहे. एका रिपोर्टनुसार, देशात या घातक व्हायरसची सुमारे सात हजार प्रकरणे झाली आहेत. यास म्यूकोर्मिकोसिस सुद्धा म्हटले जाते. या फंगसपासून बचाव करण्यासाइी डेन्टिस्टने काही उपाय तसेच लक्षणे सांगितली आहेत आहेत ती जाणून घेवूयात…
ब्लॅक फंगसची लक्षणे
ब्लॅक फंगसची प्रमुख लक्षणे आहेत – तोंड, जीभ, हिरड्यांचा रंग बदलणे, भरलेले नाक, जास्त वेदना, चेहर्याची सूज, डोळ्यांच्या खाली जडपणा, अस्वस्थता, ताप आणि डोकेदुखी.
ब्लॅक फंगसपासून बचाव करण्याचे उपाय
1 तोंडाची स्वच्छता ठेवा
कोविड मधून बरे झाल्यानंतर स्टेरॉईड आणि इतर औषधांचे सेवन तोंडात बॅक्टेरिया किंवा फंगसला वाढण्यासाठी सक्षम बनते. यामुळे सायनस, फुफ्फुसे आणि मेंदूमध्ये सुद्धा समस्या निर्माण होते. दिवसात दोन-तीन वेळा ब्रश करा. तोंडाची स्वच्छता ठेवल्याने खुप मदत होईल.
2 ब्रश बदला
कोरोना व्हायरसमधून बरे झाल्यानंतर तोंडाची चांगला स्वच्छता ठेवा. रूग्णांनी आपला टूथब्रश बदलावा आणि नियमतपणे तोंड धुवावे.
3 टूथब्रश आणि टंग क्लीनर स्वच्छ ठेवा
कोरोनातून बरे झालेल्या रूग्णाने आपला टूथब्रश इतरांच्या ब्रशपासून दूर ठेवावा. तसेच ब्रश आणि टंग क्लीनर नियमित अँटीसेप्टिक माऊथवॉशने स्वच्छ करावे.