नवी दिल्ली : वृत्तसंस्था – कोविड-19 च्या अनेक रूग्णांमध्ये बरे झाल्यानंतर फंगल इन्फेक्शनची प्रकरणे दिसून येत आहेत. ब्लॅक, व्हाईट आणि यलो इन्फेक्शनने लोकांना हैराण केल आहे. कोरोनातून बरे झाल्यानंतर या इन्फेक्शनमुळे रूग्णांना पुन्हा हॉस्पिटलमध्ये दाखल व्हावे लागत आहे.
कोरोनाचे जे रूग्ण मोठ्या कालावधीपर्यंत आयसीयुमध्ये राहतात, ज्यांना खुप जास्त ऑक्सीजन दिला जातो, ज्यांना स्टेरॉईडची जास्त मात्रा दिली गेली आहे, किंवा वाढलेली ब्लड शुगर किंवा ते लोक जे डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय स्वता औषधे घेत आहेत, त्यांना ब्लॅक फंगस होण्याचा धोका जास्त आहे.
मात्र, ब्लॅक फंगस कोरोना व्हायरस सारखा संसर्गजन्य नाही परंतु जर वेळेवर लक्ष दिले नाही तर तो धोकादायक होऊ शकतो. कोरोनातून बरे होत असलेल्या रूग्णांनी यासाठी खुप काळजी घेतली पाहिजे. ब्लॅक फंगसची सुरूवातीचे लक्षणे जाणून घेवूयात…
1 सतत डोकेदुखी –
कोरोनातून रिकव्हरी दरम्यान सतत डोकेदुखी जाणवणे, दबाव जाणवणे.
2 चेहर्याच्या एका बाजूला सूज –
हेल्थ एक्सपर्टनुसार, ब्लॅक फंगसमुळे शरीरात वेगवेळी लक्षणे दिसतात. जसे की चेहर्याच्या एका बाजूला सूज, वेदना आणि खालच्या बाजूला जडपणा. नेक्रोसिसमुळे स्किन लाल होऊ शकते.
3 रंग बदलणे, काळी पापडी तयार होणे –
ब्लॅक फंगसच्या एका लक्षणात चेहर्याची विकृती सुद्धा आहे. यामध्ये नाकाच्या चारही बाजूल काळी पापडी तयार होते, चेहर्याचा रंग खराब होतो, डोळे जड जाणवतात.
4 नाक ब्लॉक होणे –
ब्लॅक फंगस सर्वप्रथम नाकातून शरीरात शिरतो. गंभीर प्रकरणात हे फुफ्फुसावर सुद्धा हल्ला करते. नाक बंद होणे, श्वास घेण्यास जोर लागणे अशी लक्षणे दिसल्यास सतर्क व्हा.
5 दात कमजोर होणे –
काही लोकांमध्ये ब्लॅक फंगस खुप वेगाने वाढतो ज्याचा परिणाम चेहर्यावर होतो. तर काही रूग्णांमध्ये ब्लॅक फंगसमध्ये दात ढिले होण्याचे लक्षण आढळेत. काहींना जबड्याशी संबंधीत समस्या होते. अशावेळी ऑपरेशनची गरज भासू शकते.
6 तोंडाची स्वच्छता –
कोविड- 19 मधून बरे झाल्यानंतर रूग्णाने तोंडाची स्वच्छता ठेववी. एकदा निगेटिव्ह टेस्ट झाल्यानंतर टूथब्रश बदला. सोबतच नियमित तोंड आणि चेहरा स्वच्छ ठेवा.
7 माऊथवॉश करा –
एक्सपर्टनुसार, कोरोनातून बरे झालेल्या रूग्णांनी आपला ब्रश वेगळ्या ठिकाणी ठेवावा. ब्रश आणि टंग क्लीनर नियमित अँटीसेप्टिक माऊथवॉशने स्वच्छ करा.