पुणे : बहुजननामा ऑनलाईन – पुण्यात पर्वती मतदारसंघात भाजपच्या माधुरी मिसाळ विजयी झाल्या आहेत. त्यांनी 36,767 मतांनी राष्ट्रवादीच्या अश्विनी कदम यांचा दारुण पराभव केला. भाजपकडून माधुरी मिसाळ यांना उमेदवारी देण्यात आली होती. त्यांच्या विरोधात काँग्रेसने आश्विनी कदम यांना उमेदवारी दिली आहे. या मतदारसंघात या दोन्ही उमेदवारात चुरशीची फाइट सुरु होती. माधुरी मिसाळ निवडणूक निकालाच्या पहिल्या फेरीपासून आघाडीवर होत्या, सुरुवातीपासून आश्विनी कदम यांच्याबरोबर माधुरी मिसाळ यांच्यात चुरस रंगली आहे.
राज्यात झालेल्या मागील विधानसभा निवडणुकीत पर्वती विधानसभा मतदारसंघातून भाजप च्या माधुरी मिसळ यांनी 95 हजार 583 एवढी मते मिळवून विजय मिळवला आहे. पर्वती विधानसभा मतदारसंघात दुसऱ्या क्रमांकावर शिवसेनाचे सचिन टावरे होते. त्यांना 26 हजार 493 मते मिळाली. आणि त्यांचा 69 हजार 090 मतांनी पराभव झाला. पर्वती विधानसभा मतदारसंघात तिसऱ्या स्थानावर राष्ट्रवादी काँग्रेसचे सुभाष जगताप, चौथ्या स्थानावर काँग्रेस चे अभय छाजेड आणि पाचव्या क्रमांकावर मनसे चे संदीप लांडगे होते.
भाजप – माधुरी मिसाळ – 96876 (विजयी उमेदवार)
राष्ट्रवादी – आश्विनी कदम – 60148
वंचित बहुजन – ऋुषिकेश नांगरेपाटील – 7727
नोटा – 3668
Visit : bahujannama.com