BJP vs Shivsena | ‘सामना’तून अमित शहांसह भाजप नेत्यांवर टीकेचे बाण ! … तर भाजपातील नाचरे मुखवटे नगरपालिका निवडणुकीत ‘पराभूत’

BJP vs Shivsena | saamana editorial shiv sena slam bjp pm modi amit saha state bjp leadear narayan rand and devendra fadnavis

मुंबई :बहुजननामा ऑनलाईन –  BJP vs Shivsena |येत्या काही दिवसात स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुका होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींचा (PM Narendra Modi) चेहरा नसेल तर भाजपातील सध्याचे अनेक नाचरे मुखवटे नगरपालिका निवडणुकांतही पराभूत होतील, अशा शब्दात शिवसेनेने मुखपत्र असलेल्या सामनाच्या अग्रलेखातून अमित शहा (Amit Saha), नारायण राणे (Narayan Rane) आणि देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यासह राज्यातील भाजप नेत्यांवर बोचरी टीका केली आहे. अमित शहा कोणताही चमत्कार करू शकतात अशी प्रचार मोहीम राबवली गेली. पण त्यांच्याच काळात महाराष्ट्रात २५ वर्षे जुन्या शिवसेना-भाजप युतीचा तुकडा (BJP vs Shivsena) पडला. आणि भाजपला विरोधी बाकावर बसावे लागले. तिकडे पश्चिम बंगालमध्ये ही तशीच अवस्था. त्यामुळे पंतप्रधान मोदींनी जे पी नड्डा (JP Nadda) यांच्या माध्यमातून दुरुस्तीचे काम हाती घेतले असावे. भाजपचा खरा चेहरा मोदी हेच आहे, बाकी सर्व मुखवटे आहे. मोदींचा चेहरा नसेल तर भाजपमधील अनेक नाचरे मुखवटे नगरपालिका निवडणुकांतही पराभूत होतील.

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

 

‘मोदी है तो मुमकीन है –

स्वतःचे बलस्थान पंतप्रधान मोदींना माहित असल्यामुळे त्यांनी २०२४ च्या निवडणुकीच्या तयारीला सुरुवात केली आहे. त्यादृष्टीने पावले उचलली आहेत. मोदी-नड्डा जोडीने तीन राज्यांचे मुख्यमंत्री बदलले. गुजरातमध्ये तर किडकी झाडे मुळापासून उपटून टाकली.
मोदी-नड्डांचे मध्य प्रदेश, हिमाचल, हरियाणाच्या मुख्यमंत्र्यांवर बारीक लक्ष आहे.
गुजरातमध्ये मोदींनी केलेल्या बदलाच्या धसक्यातून पक्षाला सावरायला वेळ लागेल पण हाच प्रयोग त्यांची सरकारे नसलेल्या प्रदेशांतही होऊ शकतो. ‘‘मोदी है तो मुमकीन है’’ म्हणायचे ते इथे!

डॉ. नड्डा यांनी भाजप अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर पक्षात सतत बदल होत गेले आहे.
पंतप्रधान मोदींच्या मनातील प्रत्येक गोष्ट डॉ. नड्डा यांच्या माध्यमातून करून घेतले जात आहे.
उत्तराखंड व कर्नाटकचे मुख्यमंत्री नड्डा यांच्याच माध्यमातून बदलले गेले.
एका खटक्यात गुजरातचे मुख्यमंत्रीही बदलले. तेथे तर संपूर्ण मंत्रिमंडळच नवेकोरे करून टाकले. रूपाणी यांच्यामागे अमित शहांचे पाठबळ होते, पण मोदी-नड्डा जोडीने रूपाणी व त्यांच्या संपूर्ण मंत्रिमंडळास घरचा रस्ता दाखवून स्वपक्षास एक जोरदार राजकीय संदेश दिला आहे. मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल हे प्रथमच आमदार झालेले नेते त्यामुळे राजकारणात काहीच अशक्य नाही हे मोदी-नड्डा यांनी दाखवून दिले. (BJP vs Shivsena)

 

वाटेतले काटेकुटे स्वत:च दूर करतायेत मोदी –

७० वर्षीय मोदींची पावले दमदार पद्धतीने पडत आहेत. ते स्वतःच वाटेतले काटे दूर करीत आहेत. राष्ट्रीय राजकारणाचे सूत्रधार बनताच मोदींनी पक्षातील अनेक जुन्या-जाणत्यांना मार्गदर्शक मंडळात नेमले. म्हणजे हे मार्गदर्शक मंडळ कामापुरते नसून उपकारापुरतेच ठेवले. याच मार्गदर्शक मंडळात आडवाणी, मुरली मनोहर जोशी हेसुद्धा आहेत. नुकत्याच झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या फेरबदलात अनेक जुन्यांना घरचा रस्ता दाखवत नव्यांना संधी दिली आहे. रविशंकर प्रसाद (Ravishankar Prasad), प्रकाश जावडेकर (Prakash Javadekar) यांच्यावरही मंत्रीपद गमावण्याची वेळ आली. एकूणच आगामी २०२४ च्या निवडणुकीची तयारी करत असताना स्वतःकडे सूत्रे ठेवण्याचे ठरवले असून देशात एकंदरीत गोंधळाचे चित्र आहे.

 

Web Title : BJP vs Shivsena | saamana editorial shiv sena slam bjp pm modi amit saha state bjp leadear narayan rand and devendra fadnavis

Maharashtra Political News | देवेंद्र फडणवीस-जयंत पाटलांचा एकाच गाडीतून प्रवास, नव्या समीकरणांचे संकेत?

Pune Crime | ‘मॉर्निग वॉक’ला गेल्यानंतर चोरट्यांनी फोडले ‘घर’ ! चोरट्यांचा शहरात वाढला उच्छाद, अवघ्या पाऊण तासात चोरी

Pune Crime | पत्नीचे मेव्हण्याबरोबर अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरुन पत्नीच्या अंगावर ओतले मटणाचे ‘कालवण’; इंदापूरमधील घटना

Pune Crime | जखमी झालेल्या दुचाकीस्वाराला मदत करण्याऐवजी पळविला मोबाईल