मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – अनुसूचित जाती, जमातींच्या आरक्षणाला १० वर्षांची मुदत वाढवून देण्यासाठी बुधवारी विधानसभेचे एक दिवसीय अधिवेशन भरवण्यात आले होते. त्याची सुरुवात राज्यपालांच्या अभिभाषणाने झाली. नंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे मंत्रिमंडळातील सदस्यांची सभागृहाला ओळख करून देत असताना भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना मागील आसनावर बसवल्याने आक्षेप घेतला आहे.सभागृहाची एक परंपरा असते. पृथ्वीराज चव्हाण यांना मागच्या बाजूला बसवण्यात आले. तसेच मंत्रिमंडळात कोणाला घ्यायचे आणि कोणाला नाही याचा अधिकार मुख्यमंत्र्यांना असून त्यांना मंत्रिमंडळातही स्थान दिले गेले नाही, हा सभागृहाचा अवमान असल्याचे मुनगंटीवार यांनी म्हटले आहे.
ज्या समाजाला लोकशाहीच्या मंदिरात येता येत नाही त्यांच्यासाठी राजकीय आरक्षण आवश्यक आहे, असे मुख्यमंत्र्यांनी म्हटले. त्यासाठीच अनुसूचित जाती, जमातीला राजकीय आरक्षण मिळण्यासंबंधीचे अधिवेशन बुधवारी मुंबईत भरवण्यात आले होते.