मुंबई : बहुजननामा ऑनलाइन – राज्यात सत्तावाटपावरून भाजप – शिवसेनेमध्ये वाद सुरु आहे. इतर महत्वाच्या खात्यांबरोबर मुख्यमंत्रिपदासाठी शिवसेना अडून बसली आहे. भाजपने आपली मागणी पूर्ण नाही केली तर काँग्रेस-राष्ट्रवादीच्या मदतीने सरकार स्थापन करण्यासाठी शिवसेना प्रयत्नात आहे. त्यामुळे भाजपला बाजूला सारून आम्ही बहुमत सिद्ध करु असा इशारा दिला आहे. तर भाजपने मागील वेळेप्रमाणे यंदाही एकट्यानेच ५ किंवा ६ नोव्हेंबरला शपथविधी घेण्याची तयारी केली आहे.
दरम्यान शिवसेनेचे नेते खा.संजय राऊत यांनी जनतेच्या इच्छेप्रमाणे पुढील मुख्यमंत्री शिवसेनेचाच असेल असे सांगितल्याने वाद आणखीनच चिघळला आहे. तसेच 50-50 फॉर्म्युल्याचे पालन होणार असेल तरच भाजपसह सत्ता स्थापनेची तयारी आहे, असेही राऊत म्हणाले. अन्यथा काँग्रेस-राष्ट्रवादीच्या मदतीने सरकार स्थापण्याचा पर्याय शिवसेनेने खुला ठेवला आहे. अडीच वर्षांचे मुख्यमंत्रिपद व निम्मी मंत्रिपदे यावर शिवसेना अडली आहे.
त्यामुळे या दबावतंत्रामुळे शिवसेनेशिवाय ५ किंवा ६ तारखेला देवेंद्र फडणवीस यांचा मुख्यमंत्री व काही मंत्र्यांचा शपथविधी करण्याच्या तयारीने हालचाली भाजपने सुरू केल्या आहेत. त्यामुळे भाजप श्रेष्ठींनी शिवसेनेची वाट न पाहता स्वबळावर सत्ता स्थापन करण्यासाठी हालचाली करा, असे स्पष्ट आदेश राज्यातील नेतृत्वाला दिले आहेत. त्यामुळे भाजपने आपल्या १०५ आमदारांना ५ नोव्हेंबरपर्यंत कोणीही मुंबई सोडून न जाण्याचे आदेश दिले आहेत.
दरम्यान नवीन विधानसभा ९ तारखेच्या आत अस्तित्वात आली नाही तर राज्यात राष्ट्रपती राजवट लागू होईल, असे विधान अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले आहे.
तसेच राज्यातील घडामोडींवर शरद पवार यांनी पोरखेळ सुरु असल्याचे म्हंटले आहे. तसेच राज्य अडचणीत असताना राज्यकर्त्यांना जबाबदारी पार पाडता येत नाही, ही चिंतेची बाब असल्यचेही त्यांनी म्हंटले असून आम्ही विरोधी बाकावरच बसणार असल्याचे पवार यांनी म्हंटले आहे.
दरम्यान, ओल्या दुष्काळामुळे लाखो शेतकरी, कामगार हवालदिल झाले आहेत. तर दुसरीकडे विविध पक्षांचे नेते सत्तेसाठी भांडत असल्याच्या संतप्त प्रतिक्रिया सोशल मीडियात उमटत आहे.
Visit : Policenama.com
- जिममध्ये व्यायाम केल्यानंतर ‘ही’ हेल्थ ड्रिंक्स घेतल्यास होईल फायदा
कामावरुन घरी आल्यानंतर खुप थकवा जाणवतो का ? मग ‘हे’ हेल्दी फुड खा
तुम्ही कधी-कधी विक्षिप्त वागता का ? मग ‘ही’ बातमी तुमच्यासाठीच
‘हा’ आहे जीवघेणा आजार, जाणून घ्या लक्षणे …आणि वेळीच करा उपचार
‘वर्कआऊट’नंतर मांसपेशीत वेदना होतात का ? ‘हे’ प्रभावी उपाय करून पहा –
तुमचा रंग सावळा आहे का ? याचे आरोग्यदायी फायदे जाणून व्हाल थक्क ! –
मुलींनी मुलांसारखे कपडे परिधान केल्यास होऊ शकतो गर्भधारणेवर परिणाम ? –
संक्रमणापासून बचावासाठी करा; या विटॅमिनचा वापर, जाणून घ्या –
चांगल्या आरोग्यासाठी शरीराला दररोज किती कॅलरीजची असते आवश्यकता –
वजन कमी करण्याचा ‘हा’ आहे खास ‘जपानी फार्मुला’! जाणून घ्या