नवी दिल्ली : वृत्तसंस्था – दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठाचा विद्यार्थी उमर खालिद याचा एक व्हिडिओ समोर आला असून भाजपचे सोशल मीडिया प्रभारी अमित मालवीय यांनी हा व्हिडिओ प्रसिद्ध केला आहे. हा व्हिडिओ १७ फेब्रुवारी रोजी महाराष्ट्रातील यवतमाळ येथे आयोजित जाहीर सभेचा असल्याचे सांगितले जाते. या व्हिडिओमध्ये ओमर म्हणत आहे की, डोनाल्ड ट्रम्प भारतात आल्यावर रस्त्यावर उतरावे लागेल.
देशद्रोहाचा आरोप असलेल्या उमर खलिदने १७ फेब्रुवारीला अमरावतीमध्ये भाषण दिले होते. ज्यात त्याने मुख्यतः मुस्लिम लोकांना ट्रम्पच्या भारत दौऱ्यादरम्यान २४ फेब्रुवारीला मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरायला सांगत आहे. सोबतच मालवीयने प्रश्न केला की, ‘दिल्लीत भडकलेल्या हिंसेचे टुकडे-टुकडे गँगने आठवड्या अगोदरच प्लॅनिंग केले होते का?’
Umar Khalid, already facing sedition charges, gave a speech in Amaravati on 17Feb, where he exhorted a largely Muslim audience to come out on streets in huge numbers when Trump arrives in India on 24th.
Was the violence in Delhi planned weeks in advance by the Tukde Tukde gang? pic.twitter.com/feUMwpPeKS
— Amit Malviya (@amitmalviya) March 2, 2020
या व्हिडिओत खालिद हेही म्हणत आहे की, ‘आम्ही वचन देतो जेव्हा डोनाल्ड ट्रम्प भारतात येतील तेव्हा आम्ही त्यांना पंतप्रधान आणि हिंदुस्तानचे सरकार हिंदुस्थानला विभाजित करण्याचे काम करत आहे. आम्ही सर्वजण रस्त्यावर येऊ. तुम्ही लोकं उतरणार का?’
कोण आहे उमर खालिद?
उमर खालिद हा महाराष्ट्रातील अमरावती गावात राहणार असून आपल्या कुटुंबासोबत जाकिरनगर मध्ये राहतो. माहितीनुसार त्याचे वडील सैयद कासिम रसूल इलियास हे दिल्लीतच उर्दू मॅगझीन ‘अफकार-ए-मिल्ली’ चालवतात. त्यांनी इतिहास विषयात एमए आणि एमफिल केले असून तो जेएनयूमध्ये डेमोक्रॅटिक स्टुडंट युनियनशी संबंधित होते. त्यानं सीपीआय माओवादी पार्टीचे समर्थक मानले जाते.
9 फेब्रुवारी २०१६ रोजी देशविरोधी आणि दहशतवादी अफजल गुरूच्या समर्थनार्थ घोषणा दिल्याबद्दल ओमर खालिद, कन्हैया कुमार आणि अनिर्बान यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करत तिघांनाही अटक करण्यात आली होती. पण नंतर कोर्टाकडून जामीन मिळाला. या प्रकरणात अद्याप चौकशी सुरू आहे.