बहुजननामा ऑनलाइन – राज्यासह देशात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत असल्याने केंद्र सरकारने लॉकडाऊन केल्याने दुधाची मागणी घटली होती त्यामुळे दुधाचे दर कोसळले होते मात्र आता अनलॉक असताना दुधाच्या दरात वाढ होत नसल्याने दूध उत्पादक शेतकऱ्यांना दुधाचा उत्पादन खर्चही निघणे मुश्कील झाल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे दूध उत्पादकाच्या पाठीमागे उभे राहत दुधाला 30 रुपये हमीभाव मिळावा, प्रति लिटर दुधाला दहा रुपये अनुदान मिळावे, बाहेरून आयात होणारी दूध पावडर बंद करत दूध पावडरला पन्नास रुपयांचे अनुदान मिळावे या मागण्यांसाठी लासलगाव बाजार समितीच्या सभापती सुवर्णा जगताप आणि जिल्हा परिषद सदस्य डि. के. जगताप भाजपा शहर अध्यक्ष योगेश पाटील यांच्या नेतृत्वाखाली लासलगाव येथील पंचम दूध डेअरी समोर राज्य सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करत दूध रस्त्यावर ओतून देत निषेध करत आज सकाळी 10 वाजता दूध आंदोलन लासलगावी करण्यात आले.
यावेळी प्रकाश दायमा, संतोष पलोड, योगेश पाटील,कैलास सोनवणे,राजू राणा,राजेंद्र चाफेकर,रवी होळकर,दत्तूलाल शर्मा,बापू लचके,स्मिता कुलकर्णी आदी उपस्थित होते.