बहुजननामा ऑनलाईन – भारतीय जनता पक्षाने आगामी दिल्ली, महाराष्ट्र, झारखंड आणि हरियाणा विधानसभा निवडणुकांची तयारी सुरू केली आहे. भाजपने या राज्यांसाठी आपला प्रभारी आणि निवडणूक प्रभारी जाहीर केला आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांना निवडणूक प्रभारी, केंद्रीय मंत्री हरदीपसिंग पुरी आणि केंद्रीय गृह राज्यमंत्री नित्यानंद राय यांची आगामी दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी नियुक्ती केली आहे. त्याचबरोबर महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी भाजपाचे राष्ट्रीय सरचिटणीस भूपेंद्र यादव यांची प्रभारी म्हणून नियुक्ती करण्यात आली असून उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य आणि कर्नाटकचे माजी आमदार लक्ष्मण सावदी यांची नियुक्ती करण्यात आली.
तसेच केंद्रीय मंत्री नरेंद्रसिंह तोमर यांना हरियाणा विधानसभा निवडणुकीसाठी निवडणूक प्रभारी आणि उत्तर प्रदेशचे मंत्री भूपेंद्र सिंग यांची निवडणूक सह प्रभारी म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. झारखंड विधानसभा निवडणुकीसाठी भाजपाचे राष्ट्रीय सरचिटणीस ओम प्रकाश माथूर यांची निवडणूक प्रभारी आणि बिहारचे मंत्री नंदकिशोर यादव यांची निवडणूक सह प्रभारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
याचबरोबर दिल्ली, महाराष्ट्र, झारखंड आणि हरियाणामध्ये विधानसभा निवडणुका या वर्षाच्या अखेरीस होऊ शकतात. मात्र, याबाबत निवडणूक आयोगाने कोणतीही तारीख जाहीर केलेली नाही.
BJP President & Home Minister Amit Shah appoints BJP General Secretary Bhupendra Yadav as Election In-charge, Deputy Chief Minister of Uttar Pradesh Keshav Prasad Maurya & former Karnataka MLA Laxman Savadi as Election Co-Incharges, for the upcoming Maharashtra Assembly Polls. pic.twitter.com/D74Sn9oM46
— ANI (@ANI) August 9, 2019
BJP President & Home Minister Amit Shah appoints Union Minister Prakash Javadekar as Election In-charge, Union Minister Hardeep Singh Puri & Minister of State for Home Affairs Nityanand Rai as Election Co-Incharge, for the upcoming Delhi Assembly Elections. pic.twitter.com/i596kWbYvD
— ANI (@ANI) August 9, 2019