मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – केंद्रात वर्चस्व असलेल्या भाजपला राज्यात मात्र धक्के बसण्यास सुरुवात झाली असून सत्ता गेल्याने पक्षांतर्गत नाराजीचे प्रमाण वाढले आहे. काही दिवसांपूर्वीच एकनाथ खडसे यांनी भाजपला घरचा आहेर दिला होता. त्यानंतर माजी आमदार प्रकाश शेंडगे यांनीदेखील पक्षावर आरोप करण्यास सुरुवात केली आहे. राज्यातील नेतृत्व ओबीसी नेत्यांना डावलण्याचे काम करत असल्याचे त्यांचे म्हणणे असून पंकजा मुंडे यांची त्यांना साथ मिळणार असल्याचे बोलले जात आहे.
बुधवारी एकनाथ खडसेंनी पंकजा मुंडे यांची भेट घेतली. भेटीनंतर भाजपच्या विधानसभेला कमी झालेल्या जागा आणि जास्त जागा मिळूनही सत्तेबाहेर गेल्याच्या कारणांचा खुलासा केला. तर प्रकाश शेंडगे यांनी गोपीनाथ मुंडे यांच्यासंदर्भात गौप्यस्फोट केला होता. त्यांनी सांगितले कि, दिवंगत गोपीनाथ मुंडे यांची पक्षातून हकापट्टी करण्यासाठी दिल्लीतून आदेश आला होता. केंद्रीयमंत्री प्रकाश जावडेकर हा निरोप घेऊन असता आम्ही विरोधी केल्यानंतर हा आदेश मागे घेण्यात आला होता. त्यामुळे पंकजा मुंडे यांनी सावध राहावे, असा इशारा शेंडगे यांनी केला.
वास्तविक, महाविकासआघाडीचे सरकार स्थापन करण्यापूर्वी प्रत्येक नेता हा पक्षतील शिस्तीचे पालन करत होता. तर काही नेत्यांनी माध्यमांसमोर बोलण्याचे टाळत होते. मात्र आता नाराज नेत्यांनी बोलण्यास सुरुवात केली असून भाजपमधील अंतर्गत डावपेच उघडकीस येण्यास सुरुवात झाली आहे.
Visit : bahujannama.com