मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – भाजपाच्या नेत्या पंकजा मुंडे यांच्या गोपीनाथ गडावर होणाऱ्या मेळाव्याकडे… गोपीनाथ गडावरील मेळाव्यात त्या कोणती वाट निवडणार याची सर्वत्र चर्चा रंगली आहे. त्याबाबत पंकजा मुंडे यांनी स्वत: ‘इतके दिवस थांबला आहात, तर आणखी एक दिवस थांबा’ असे सूचक उत्तर दिले आहे. स्व. गोपीनाथ मुंडे यांच्या जयंतीनिमित्त पंकजा मुंडे उद्या (१२ डिसेंबर ) कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत.
गोपीनाथ गडावर हा मेळावा होणार असून याच दिवशी परळीत स्वाभिमान दिन साजरा करण्यात येणार आहे. गोपीनाथ गडावर होणाऱ्या मेळाव्याला अवघा एक दिवस बाकी आहे. या मेळाव्याची सध्या जय्यत तयारी सुरु आहे, संपूर्ण परळीत मेळाव्याचे पोस्टर लावले जात आहे. परंतु, या पोस्टरवरून कमळ हद्दपार झाल्याचे दिसून येत आहे.
पोस्टरवर कुठेही भाजपचे नाव किंवा कमळाचे चिन्ह नाही. त्याठिकाणी भाजपचे झेंडेदेखील लावण्यात आलेले नाही. या मेळाव्याच्या पोस्टरवरून असे दिसून येते आहे की, पंकजा मुंडे खरंच वेगळा मार्ग निवडणार आहेत का ? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. लोकनेते गोपीनाथ मुंडे यांची जयंती आहे. यांच्या जयंतीनिमित्त पंकजा मुंडे यांनी उद्याच्या दिवशी स्वाभिमान दिवस असा नारा देत निर्णय घेण्याचा इशारा दिला आहे. मात्र यातील एकाही बॅनरवर भाजपचे चिन्ह नाही. त्यामुळे चर्चांना उधाण आले आहे. अशा परिस्थितीत पंकजा मुंडे नक्की कोणती वाट निवडणार ? याकडे पूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.
Visit : bahujannama.com